फोटो सौजन्य- pinterest
सर्वपित्री अमावस्येला आश्विन अमावस्या किंवा महालय अमावस्या असे म्हटले जाते. या दिवशी ज्ञात आणि अज्ञात पूर्वजांचे श्राद्ध देखील केले जाते. सर्वपित्री अमावस्या ही अशी तारीख आहे ज्यावेळी संपूर्ण वंशाचे पूर्वज फक्त एक श्राद्ध करून संतुष्ट होऊ शकतात. या दिवशी दान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो तर जिवंतांना सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य प्रदान करते. शास्त्रामध्ये सर्वपित्री अमावस्येला विशेष महत्त्व आहे. यावेळी काळ्या तिळाचा उपाय केल्याने अनेक फायदे होतात. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी विशेष उपाय केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात, असे म्हटले जाते. तसेच तुमच्या संपत्तीमध्ये देखील वाढ होते. सर्वपित्री अमावस्येला काळ्या तिळाचे उपाय कसे करायचे, जाणून घ्या
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचे ध्यान करुन वाहत्या पाण्यामध्ये काळे तीळ सोडा. असे केल्याने तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. याशिवाय शनिदोष, साडेसाती किंवा धैय्या यांचे अशुभ परिणामही कमी होतात. त्याशिवाय काळे तिळाचे दान केल्याने कालसर्प दोष, पितृदोष आणि राहू केतूच्या अशुभ प्रभावापासून देखील सुटका मिळते.
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी मूठभर काळे तीळ घेऊन ते कुटुंबातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरुन सात वेळा फिरवून घराच्या उत्तर दिशेला फेकून द्या. असे केल्याने पूर्वजांचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि वारंवार येणाऱ्या समस्या दूर होण्यास मदत होते.
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पाण्यात काळे तीळ आणि कुश टाका त्यानंतर ओम पितृभ्य: स्वधा नम: या मंत्राने अर्पण करा. असे केल्याने पूर्वज संतुष्ट होतात आणि त्यांच्या वंशजांना सुख, समृद्धी आणि संततीचा आशीर्वाद देतात. त्यासोबतच संध्याकाळी तिळाचा तेलाचा दिवा लावून त्यामध्ये काही तीळ टाका आणि हा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा. असे केल्याने पितृदोष दूर होतो. तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुरू असलेल्या तणावातूनही सुटका होते.
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी काळे तीळ, कुश गवत आणि लाल धागा वापरून एक संरक्षक धागा बनवा आणि तो तुमच्या उजव्या हाताला बांधा. असे केल्याने नकारात्मक शक्तींपासून आणि पूर्वजांच्या क्रोधापासून संरक्षण होते. त्यासोबतच ओम पितृभ्यः स्वाहा असे म्हणताना काळे तीळ अग्नीला अर्पण करा. असे केल्याने पूर्वजांना शक्ती, शांती आणि वंशजांना समृद्धी मिळते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)