फोटो सौजन्य- pinterest
ज्यावेळी शनि देव आपले परिवर्तन करतो म्हणजे आपली गती बदलतो त्या अवस्थेला शनिची प्रत्यक्ष गती म्हणतात. ज्योतिषशास्त्रात, शनिच्या या हालचालीचा सर्व राशींच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. ज्यावेळी शनि परिवर्तन करतो त्यावेळी कर्मांचे परिणाम लवकर लक्षात येतात. यावेळी शनिच्या होणाऱ्या हालचालींचा परिणाम काही राशींच्या लोकांसाठी फायदेशीर असतो. या राशीच्या लोकांना पैसा, करिअर आणि प्रतिष्ठा या क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता असते. शनिच्या परिवर्तनाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या
शनिच्या परिवर्तनाचा परिणाम वृषभ राशीच्या लोकांवर होणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा परिणाम फायदेशीर असणार आहे. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे या काळात परत मिळू शकतात. व्यवसायात प्रगती होईल आणि गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. विविध स्रोतांकडून पैसे मिळण्याची शक्यता देखील आहे.
शनिदेवाच्या आशीर्वादाने कन्या राशीच्या लोकांना या परिवर्तनाचा खूप फायदा होणार आहे. प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मकता प्रबळ होईल. तुम्हाला नवीन नोकरी किंवा पदोन्नती मिळू शकते. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल.
शनिच्या परिवर्तनामुळे धनु राशीच्या लोकांना नवीन संधी मिळतील. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून, सरकारी योजनेतून किंवा रखडलेल्या कामातून फायदा होऊ शकतो. हा काळ तुमच्यासाठी आर्थिक स्थिरता आणि प्रगती होईल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी देखील हा काळ योग्य राहील.
मकर राशीच्या लोकांसाठी शनिचे परिवर्तन खूप फायदेशीर ठरणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि जुन्या समस्या सोडवल्या जातील. याशिवाय तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. जे लोक व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप शुभ असणार आहे.
शनिच्या परिवर्तनामुळे कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आदर आणि मान्यता मिळेल. पदोन्नती देखील होऊ शकते. तसेच या काळामध्ये गुंतवणूक करणे देखील खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला राहणार आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: ज्यावेळी शनि देव आपले परिवर्तन करतो म्हणजे आपली गती बदलतो त्या अवस्थेला शनिची प्रत्यक्ष गती म्हणतात.
Ans: शनिच्या परिवर्तनाचा वृषभ, कन्या, धनु, मकर, कुंभ राशीच्या लोकांना फायदा होणार
Ans: होय, शनिचे परिवर्तन फायदेशीर आहे






