फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रात, शुक्र ग्रहाचे संक्रमण आणि नक्षत्र परिवर्तन हे दोन्ही खूप विशेष आणि महत्त्वाचे मानले जातात. शुक्र ग्रहाला सौंदर्य, प्रेम, कला, संपत्ती, विलासिता आणि नातेसंबंधांचा कारक मानले जाते. शुक्राचे हे नक्षत्र संक्रमण शुक्रवार, 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी शुक्र ग्रह स्वाती नक्षत्रात प्रवेश करेल. ज्यावर स्वातंत्र्य आणि धैर्याचे प्रतीक राहूचे राज्य आहे.
पंचांगानुसार, शुक्रवार 7 नोव्हेंबर रोजी 9.13 वाजता शुक्र ग्रह स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि या नक्षत्रामध्ये तो 18 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. ज्यावेळी शुक्र राहू ग्रहाच्या नक्षत्रात प्रवेश करतो त्यावेळी व्यक्तीच्या जीवनामध्ये नवीन संधी, आकर्षण आणि आत्मविश्वास तयार होतो. शुक्राच्या नक्षत्रातील बदल काही राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. नक्षत्र संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे ते जाणून घ्या
शुक्राचे हे नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. नोकरी बदलण्यासाठी किंवा नवीन प्रकल्पावर काम सुरू करण्यासाठी हा काळ खूप अनुकूल राहील. नवीन प्रयत्नांमुळे ओळख मिळू शकते, उत्पन्नाचा स्रोत तयार होऊ शकतो. अविवाहित व्यक्तींसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. उत्पन्नातही वाढ होईल. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल.
शुक्राचे नक्षत्र परिपवर्तन मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. मिथुन राशीसाठी हा काळ उर्जेने भरलेला राहील. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तसेच तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील. प्रवास शक्य आहे, ज्यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात. वैवाहित जीवन चांगले राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला फायदा होईल. तुम्हाला तुमच्या आवडत्या कंपनीत काम करण्याची संधी मिळेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे संक्रमण खूप महत्त्वाचे असणार आहे. या काळात सिंह राशीच्या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा आणि मान्यता मिळू शकते. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसाय भागीदारीत यश मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. या काळात तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






