फोटो सौजन्य- pinterest
शुक्रवारचा दिवस धनाची देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने खूप शुभ परिणाम मिळतात. शुक्रवारचा दिवस खूप खास मानला जातो कारण या दिवशी श्रावण पौर्णिमा आहे. तसेच श्रावण महिन्यातील तिसरा शुक्रवार देखील आहे. जर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी काही उपाय केल्यास तुम्हाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल. त्याचसोबत तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि संपत्तीमध्ये वाढ होईल. शुक्रवारी पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करायचे, जाणून घ्या
शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करतात लाल रंगांचे कापड, साडी, हळद, दूर्वा, काही पैसे आणि जिरे या गोष्टी अर्पण कराव्यात. जिऱ्याऐवजी तुम्ही कच्चे तांदूळ देखील अर्पण करू शकता. हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरेल. दुसऱ्या दिवशी पैसे उचलून तुमच्या तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा. त्यामुळे आर्थिक समस्या दूर होतील आणि तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. जिरे ठेवलेली जागा कधीही रिकामी ठेवू नये त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा राहून घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही.
शुक्रवारी देवी लक्ष्मी पूजा करताना तिला खिरीचा नैवेद्य दाखवावा. यावेळी शक्य असल्यास खिरीमध्ये थोडे केसर टाकावे. असे केल्याने जीवनातील समस्यांपासून सुटका होते आणि घरामध्ये सुख समृद्धी राहते. मान्यतेनुसार देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवल्याने घरातील समस्या हळूहळू कमी होऊ शकतात. जीवनात यशाचे नवीन मार्ग उघडतात.
पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्राला दूध अर्पण करावे. यावेळी चंद्राच्या मंत्रांचा जप करावा. असे केल्याने व्यक्तीच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होण्यास मदत होईल. पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि अडकलेले कामही हळूहळू पूर्ण होऊ लागेल. यामुळे घरगुती त्रासांपासून सुटका होईल.
शुक्रवारी संध्याकाळी देवी लक्ष्मीची आरती करताना कापूर आणि लवंगाचा वापर करावा. त्यासोबत तुळशीचाही वापर करावा. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांवर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. तसेच जीवनात प्रगती करण्यासाठी शुक्रवारी देवी लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण करावे. फूल अर्पण करताना ‘ओम कमले कमलालये प्रसीद प्रसीद’ या मंत्रांचा जप करावा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)