gaahininath
बैलगाडी बनवून झाली आता त्याला गाडीवान देखील पाहिजे. मग मातीच्या गोळ्यापासून छोटा गाडीवान गोरखनाथ तयार करत होते. त्यावेळी गोरखनाथांच्या मुखी संजिवनी मंत्राचं पठण सुरु होतं. गोरखनाथांच्या मंत्रांमध्ये एवढी ताकद की, त्या मातीच्या पुतळ्यातून एक जीव निर्माण झाला. ते लहान बाळ रडू लागलं. हे बाळ म्हणजेच गहिनीनाथ, असंं म्हटलं जातं. तर काहींच्या मते असं देखील सांगितलं जातं की, गहिनीनाथ हे महादेवांचा अंश आहेेत. आपले गुरु गोरखनाथ यांनी दाखवलेल्या मार्गावर गहिनीनाथांनी योग,विद्या आणि अध्यात्माचा प्रसार केला. गहिनीनाथ हे नाथ संप्रदायातील तिसरे गुरु. गहिनीनाथांचं जन्मस्थान नेमकं सांगता येणार नाही पण नाथसंप्रदायात गहिनीनाथांना देखील मोठं महत्व आहे.
असं म्हणतात की, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ आणि गहिनीनाथ हे सर्व नाथ अयोनी संबंधातून अवतरले होते. म्हणजेच आई वडिलांविना जन्म झालेले. अयोनी संबंधातून प्रकट झालेल्या सर्व नाथांनी आपल्या सर्व शक्ती, साधना, सामर्थ्य, देवतांनी दिलेले वचन आणि वामशक्तींची वचने, स्वतः निर्माण केलेले काव्य-मंत्र हे सर्व गहिनीनाथांकडे सोपविले आणि गोरखनाथांनी योजनेप्रमाणे गहिनीनाथांनी ते सर्व पुढे निवृत्तीनाथांकडे सोपविले.
अशा प्रकारे नाथपंथ हळूहळू वाढीस लगला आणि त्याचा विस्तार पुढच्या पिढीने वाढवत नेला. आजही हा नाथ पंथ अखंड गुरुपरंपरेने आणि त्याच शिस्तीने कार्य करीत आहे. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली अशी चार युगे आहेत.






