रणबीर कपूरचा व्हिडिओ व्हायरल (फोटो- ट्विटर)
कांस फेस्टिवलमध्ये आलिया भट्ट झाली होती ट्रोल
एअरपोर्टवर रणबीर आणि आलिया झाले स्पॉट
रणबीर कपूरची कृती झाली व्हायरल
Ranbir Kapoor & Alia Bhatt: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलीवूडमधले एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि अभिनेते आहेत. सध्या फ्रान्समधील प्रतिष्ठित ‘कांस फिल्म फेस्टिव्हल 2026 सुरू आहे. त्यामध्ये आलिया भट्टने (Entertainment) हजेरी लावली होती. अखेर आलिया भट्ट भारतात परतली आहे. त्यावळेस तिचा आणि रणबीर कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एअरपोर्टवरील आहे.
आलिया भट्टने कांस फेस्टिवलमध्ये हजेरी लावली होती. तिच्या हटके फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. “आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर्सनी आलियाकडे दुर्लक्ष केले,” असे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. ही चर्चा सुरू असतानाच ती पापाराझी आणि चाहत्यांनी तिला गराडा घातला. तेव्हा रणबीर कपूरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आलिया भट्ट सोशल मिडियावर ट्रोल होत असताना सोनू सूदने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. आलिया भट्टकडे दुर्लक्ष केल्याचे म्हणत तीला ट्रोल केले गेले. त्यांनंतर आता रणबीर कपूरची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.
#AliaBhatt and #RanbirKapoor at the airport today❤️ pic.twitter.com/AE1A2H7Rxj — MissMalini (@MissMalini) May 17, 2026
एअरपोर्टवरून बाहेर पडताना आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एअरपोर्टच्या एक्झिट गेटवरून बाहेर येताच रणबीर कपूरने आधी तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींना (फोटोग्राफर्सना) हात जोडून अभिवादन केले. मात्र त्याने काही क्षणात रागातच बोट दाखवत इशारा केला. त्याचा या कृतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आलियाला कांसमध्ये मिळालेल्या संमिश्र प्रतिक्रिया आणि एअरपोर्टवर झालेली गर्दी यामुळे रणबीर कपूर चिडला असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्राजक्ता माळीच्या मराठमोळ्या लुकवर चाहते फिदा
आंतराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठीत अशा कान्स फेस्टिव्हलला पहिल्यांदा मराठी कलाकारांनी देखील उपस्थिती लावली आहे. मराठी सिनेविश्वाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडत असून 79 हा कान्स फेस्टिव्हल महाराष्ट्रासाठी काहीसा विशेष ठरला आहे हे नक्की. या फेस्टिव्हलमध्ये आतापर्यंत पुष्कर जोग या मराठमोळ्या कलाकाराची देखील एन्ट्री झाली. याचशिवाय अशोक सराफ, निवेदिता सराफ, अंकिता वालावलकर आणि प्राजक्ता माळी हे कलाकार देखील उपस्थित होते.






