फोटो सौजन्य- pinterest
विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदासाठी वटसावित्रीचे व्रत पाळले जाते. हे व्रत सर्वप्रथम सावित्रीने आपल्या पतीसाठी पाळले होते. सावित्रीने तिच्या भक्ती आणि हुशारीने यमराजापासून तिच्या पतीचे प्राण परत मिळवले होते. सर्व विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात.
हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्तव असते. पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे आणि दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा म्हटले जाते. या दिवशी अनेक ठिकाणी विवाहित महिला पौर्णिमेचे व्रत पाळतात आणि त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. जाणून घ्या वटसावित्री आणि वटुपौर्णिमा नेमकी कधी आहे.
ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला वट सावित्री व्रत पाळले जाते. उत्तर महाराष्ट्रात वटसावित्रीचे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळतात. या व्रताच्या तिथीची सुरुवात सोमवार, 26 मे रोजी दुपारी 12.11 मिनिटांनी सुरु होईल आणि त्याची समाप्ती मंगळवार, 27 मे रोजी सकाळी 8.31 मिनिटांनी होईल. ज्येष्ठ अमावस्या तिथी दुपारी येते तेव्हा वट सावित्री व्रत दुपारी करणे योग्य आहे, असे म्हटले जाते.
तसेच महाराष्ट्रामध्ये मंगळवार 10 जून रोजी सकाळी 11.35 मिनिटांनी पूर्णिमा तिथीची सुरुवात होईल तर त्याची समाप्ती बुधवार, 11 जून रोजी दुपारी 1.13 मिनिटांनी होईल. उद्यतिथीनुसार वटपौर्णिमेचे व्रत बुधवार, 11 जून रोजी पाळले जाणार आहे.
देशाच्या वेगवेगळ्या भागात वट सावित्री व्रत वेगवेगळ्या तारखांना पाळले जाते. उत्तर भारतात, वट सावित्री अमावस्या साजरी केली जाते, तर महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात, ज्येष्ठ पौर्णिमे म्हणजेच ‘वट पौर्णिमा’ म्हणून हे व्रत पाळले जाते जे यावेळी 11 जून रोजी आहे.
वटसावित्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर उपवास करावा. महिलांनी या दिवशी प्रामुख्याने लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे आणि श्रृंगार करावा. यानंतर वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याची पूजा करुन हळद, कुंकू, संपूर्ण तांदूळ, सिंदूर, माऊली (कळवा), पाणी, फळे आणि इतर पूजा साहित्य सोबत ठेवा. वडाच्या झाडावर कच्चा धागा गुंडाळा आणि त्याला सात, २१ किंवा १०८ वेळा प्रदक्षिणा घाला. मग सावित्री-सत्यवानाची कथा वाचा आणि तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा. दुसऱ्या दिवशी पाणी किंवा फळांनी उपवास सोडा.
धार्मिक मान्यतेनुसार, यमराजांनी माता सावित्रीचे पती सत्यवान यांचे वटवृक्षाखाली प्राण परत केले होते आणि त्यांना 100 पुत्रांचा आशीर्वाद दिला. तेव्हापासून वटसावित्री आणि वटपौर्णिमा व्रताची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की, वट सावित्रीच्या व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्यास भगवान यमराजासह त्रिमूर्तीचा आशीर्वाद मिळतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)