फोटो सौजन्य- chatgpt
मरिआई किंवा मरिअंबा ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातील अनेक भागात पूजली जाणारी एक महत्त्वाची ग्रामदैवता आहे. ग्रामीण भागात तिला रोगांपासून संरक्षण करणारी, गावाचं रक्षण करणारी आणि संकट दूर करणारी माता म्हणून मानलं जातं. मरिआई ही आदिशक्ती किंवा पार्वती याचं एक लोकदैवत स्वरुप मानलं जातं. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये त्यांच्या उत्पती बाबत वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात त्यामुळे मरिआईची एकच सार्वत्रिक कथा उपलब्ध नाही पण तरीही एक कथा अनेकांना माहीत असेल, जाणून घेऊया त्या कथेबाबत
फार वर्षांपूर्वी एका गावात अचानक भयानक रोगराई पसरली. ताप, देवी, कांजण्या आणि इतर साथींच्या आजारांमुळे अनेक लोक आजारी पडू लागले. गावकऱ्यांनी अनेक उपाय केले पण रोग काही कमी होत नव्हता. संपूर्ण गाव भीतीच्या सावटाखाली आला त्याच काळात गावातील एका वृद्ध भक्त स्त्रीला स्वप्न पडलं. स्वप्नात एक तेजस्वी देवी प्रकट झाली आणि म्हणाली मी या भूमीची रक्षण कर्ती आहे माझी भक्तीभावानं पूजा करा, गाव स्वच्छ ठेवा, एकमेंकांना मदत करा आणि श्रद्धा ठेवून प्रार्थना करा. तुमच्या गावावरील संकट दूर होईल. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी गावाच्या वेशींवरती देवीची स्थापना केली. सर्वांनी मिळून गावाची स्वच्छता केली, पूजा अर्चा केली आणि एकमेंकांची सेवा केली.
लोककथेनुसार, काही दिवसांत ही रोगराई ओसरु लागली, गाव पुन्हा सुखी झालं त्या दिवसांपासूनच गावकऱ्यांनी देवीला मरिआई म्हणून मान दिला. काही अभ्यासकांच्या मते, मरि हा शब्द जु्न्या द्रविड भाषेमध्ये रोगराई किंवा महामारी या अर्थाशी संबंधित आहे त्यामुळे मरि आईला पूर्वी देवी, कांजण्या, कॉलरा किंवा इतर साथींच्या रोगांपासून संरक्षण करणारी देवी म्हणून पूजलं जात असे.
महाराष्ट्रातली सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, बीड, धाराशिव आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये मरि आईची स्थानिक मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिरांचा इतिहास आणि स्थापना स्थानिक लोकपंरपरेनुसार वेगवेगळा आहे.
चैत्र, आषाढ किंवा स्थानिक परंपरेनुसार जत्रा भरवल्या जातात. देवीला हळद, कुंकू, फुल, ओटी, नारळ अर्पण केली जाते. अनेक गावांमध्ये भजन, गोंधळ, पालखी आणि सामुदायिक पूजा देखील केली जाते. मरिआईची अनेक सामुदायिक मंदिरे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आढळतात. अनेक गावांमध्ये त्या ग्रामदैवत म्हणून प्रतिष्ठित आहेत.
साथींच्या रोगावरती आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध होण्यापूर्वी मरिआईची पूजा केली जात असे. आजही ग्रामीण भागामध्ये मरिआईची जत्रा धार्मिक आणि सांस्कृतिकष्ट्या महत्त्वाची मानली जाते. अनेक ठिकाणी गावाच्या वेशीवरती मरिआईचं मंदिर देखील असतं ते गावाच्या रक्षणाचं प्रतीक मानलं जातं. मरिआई देवी या महाराष्ट्रातल्या लोकप्रिय ग्रामदैवतांपैकी एक आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मरिआई देवी ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातील अनेक भागांत पूजली जाणारी ग्रामदैवत असून ती गावाचे आणि ग्रामस्थांचे रक्षण करणारी देवी मानली जाते.
Ans: लोकश्रद्धेनुसार देवी, कांजण्या, कॉलरा आणि इतर साथीच्या रोगांपासून गावाचे संरक्षण करण्यासाठी मरिआई देवीची पूजा केली जात असे.
Ans: लोककथेनुसार एका गावात रोगराई पसरल्यानंतर देवीने स्वप्नात दर्शन देऊन स्वच्छता, श्रद्धा आणि सामूहिक प्रार्थनेचा संदेश दिला. त्यानंतर गावावरील संकट दूर झाल्याची श्रद्धा आहे.






