फोटो सौजन्य - Social Media
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफानीचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक भाविक मोठ्या श्रद्धेने नदीला दुधाचा अभिषेक घालत आहे. नदीचे पूजन करणे हा भारतीय संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे पण निसर्गाची आराधना करताना माणुसकीचे दहन केले तर नक्कीच त्यापेक्षा मोठे पाप कोणते नाही. कारण व्हिडिओमध्ये नदीची आराधना करत असताना नदीला दूध वाहत असताना त्या व्यक्तीने त्याच्या डोळ्यादेखत भुकेला भागवण्यासाठी चालू असलेली धडपडीला मुद्दाम दुर्लक्ष करत पुण्य कमवण्याचे सगळ्यात मोठे पाप केले आहे. पण तुम्हाला माहित आहे का? नदीला खासकरून गंगेला दूध वाहण्याच्या प्रथेमागचं नेमकं कारण काय? जाणून घेऊयात.
यामागे एक गोष्ट आहे. पुराणानुसार, समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल नावाचे विष बाहेर निघते. ते अतिशय घातक असते, असुर तसेच देवांसाठीसुद्धा! तेव्हा स्वतः महादेव तिथे सर्व देव आणि असुरांना दर्शन देतात आणि ते विष स्वतः प्राशन करतात आणि सर्व देव-असुरांची यातून सुटका करतात. मुळात, महादेवांनी केलेले हे कार्य सर्व देव-असुरांसाठी एक उपकारच जणू! त्यामुळे शंकराला दूध तसेच जलाने अभिषेक घातले जाते.
गंगा महादेवाच्या जटांमधून वाहते म्हणजे शंकरचेच एक भाग! त्यामुळे गंगेला दुधाचा अभिषेक घातला जातो. लोकांची अशी श्रद्धा आहे पण कधी कधी माणुसकीचा ही विचार करावा लागतो.
देव नाही म्हणत की मला हेच हवं आहे. याउलट ईश्वर निसर्गात आहे असं आपण म्हणतो तर देव माणसातसुद्धा आहे. मग आपण जेव्हा देवाच्या नावाने एखादी गोष्ट पाण्यात सोडतो किंवा बळी देतो आणि त्याचवेळी गरजू समोर उभा आहे, त्याचंडोळ्यादेखत आपण त्याचा हक्क मारतो, तेव्हा नक्कीच या गोष्टीपेक्षा मोठे पाप कोणते नसावे. त्यामुळे जरूर आपण आपल्या श्रद्धेचा मान राखला पाहिजे, पण हे मान राखताना एक गरजू आपल्यासमोर आला, देवाला जाणारा मान त्याच्या गरजेची पूर्तता करत असेल तर हा माणूस नक्कीच देवाने आपली परीक्षा घेण्यासाठी पाठवला आहे असा समज धरून त्याला त्याचा हक्क किंवा मान द्यावा.






