हिंदू धर्मानुसार महिला स्मशानात का जात नाहीत (फोटो सौजन्य - iStock)
सनातन धर्मात एकूण १६ विधी आहेत, त्यापैकी १६ वा विधी म्हणजेच अंतिम विधी केला जातो. हिंदू धर्मात, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनेक परंपरा आणि विधी केले जातात. एखाद्या व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी, त्याचे शरीर स्मशानभूमीत नेले जाते.
येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हिंदू धर्मात महिलांना स्मशानात जाण्यास सक्त मनाई आहे. तुम्हाला यामागील कारण माहीत आहे का? गरुड पुराणाच्या या भागात, महिला स्मशानात का जाऊ शकत नाहीत हे सविस्तरपणे जाणून घेऊया.
काय आहे नक्की कारण?
जेव्हा कोणी मरते तेव्हा सर्वत्र दुःख पसरते. जेव्हा मृत व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेले जाते, तेव्हा हा क्षण कुटुंबातील सदस्यांसाठी वेदनादायक असतो. अशा काळात, महिलांना स्मशानात जाण्यास मनाई आहे कारण महिलांना पुरुषांपेक्षा जास्त संवेदनशील मानले जाते. एखाद्या नातेवाईकाच्या मृत्यूमुळे त्यांना जास्त दुःख होऊ शकते. केवळ याच कारणामुळे त्यांना स्मशानात येण्यास मनाई आहे. यामागे इतर कोणतेही कारण नाही
40 दिवसात होणार शनिचा कहर, मेष-सिंह राशींसह 4 राशींना शनिमुळे होणार तगडे नुकसान
वाईट शक्तींचा प्रभाव
गरुड पुराणानुसार, स्मशानभूमीत वाईट आत्मे असू शकतात. दुसरीकडे, मृत्यूच्या शोकात असलेल्या महिलांना त्यांचे मन नियंत्रित करता येत नाही आणि अशावेळी जर एखादी स्त्री स्मशानात गेली तर तिच्यावर वाईट शक्तींचा प्रभाव पडू शकतो. अशा परिस्थितीत त्यांना स्मशानभूमीत जाण्यास मनाई आहे, जेणेकरून त्यांच्या मनावर कोणताही वाईट प्रभाव पडू नये
घरातून एकटे निघू शकत नाही
जेव्हा एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडते तेव्हा घरात आणि कुटुंबात शोककळा पसरते. गरुड पुराणानुसार, मृतदेह स्मशानात नेल्यानंतरही त्याचा आत्मा काही दिवस घरात राहतो. अशा परिस्थितीत घराला एकटे सोडले जात नाही आणि यासाठी महिला घरीच राहतात. पुरुष मृतदेह खांद्यावर घेऊन स्मशानभूमीत जातात.
Shani Gochar: होळीनंतर शनि गोचरमुळे 3 राशींच्या व्यक्तींना येणार ‘अच्छे दिन’, पैशात लोळणार
मुंडण करणे अनिवार्य आहे
जेव्हा लोक अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जातात तेव्हा त्यांना त्यांचे मुंडण करणे अनिवार्य असते, तथापि, महिला आणि मुलींचे मुंडण करणे अशुभ मानले जाते. या कारणामुळे देखील महिलांना स्मशानभूमीत जाण्याची परवानगी नाही. गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे सदर वैज्ञानिक आणि काही महत्त्वाची कारणं यामध्ये आम्ही नमूद केली आहेत. तुम्हाला हे वाचून योग्य माहिती मिळाली की नाही हे आम्हाला सांगायला विसरू नका
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.