Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ayatollah Ali Khamenei: शिया राजकारणाचा मेरुमणी कोसळला; इराणला अण्वस्त्रशक्ती बनवणाऱ्या ‘अदृश्य’ सम्राटाचा ‘असा’ होता जीवनप्रवास

Khamenei Life Story: अयातुल्ला अली खामेनी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या खामेनी यांनी 37 वर्षे इराणवर राज्य केले आणि शिया राजकारणातील सर्वात प्रमुख व्यक्ती बनले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 01, 2026 | 11:18 AM
ali khamenei life story biography fromcleric to supreme leader of iran death news

ali khamenei life story biography fromcleric to supreme leader of iran death news

Follow Us
Close
Follow Us:
  • युगाचा अंत
  • संघर्षातून उदय
  • कौटुंबिक शोकांतिका

Ali Khamenei life story and biography Marathi : इराणच्या (Iran) सत्तेचा ‘सूर्य’ मानले जाणारे अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांचा काळ आता कायमचा संपला आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त लष्करी कारवाईत खामेनी यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जगाचे लक्ष आता तेहरानकडे लागले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या या नेत्याचा प्रवास कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नव्हता. एका सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा इराणचा ‘सर्वोच्च भाग्यविधाता’ कसा बनला आणि त्यांनी जगातील सर्वात मोठ्या शक्तींना कसे आव्हान दिले, ही कहाणी आता पुन्हा एकदा चर्चिली जात आहे.

मशहाद ते कोम: धार्मिक शिक्षणाचा पाया

अली खामेनी यांचा जन्म १९ एप्रिल १९३९ रोजी इराणमधील मशहाद येथील एका धार्मिक आणि साध्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील स्वतः एक धर्मगुरू होते, त्यामुळे घरातूनच त्यांना धर्माचे बाळकडू मिळाले. अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी धर्मगुरू बनण्याचे शिक्षण पूर्ण केले. मात्र, त्यांच्या जीवनाला खरी कलाटणी मिळाली जेव्हा ते ‘कोम’ या पवित्र शहरात गेले. तिथे त्यांची भेट अयातुल्ला खोमेनी यांच्याशी झाली. खोमेनींच्या विचारांनी खामेनी इतके प्रभावित झाले की त्यांनी केवळ धर्मच नाही, तर राजकारणातही क्रांती घडवण्याचा निश्चय केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ali Khamenei: तेहरानमध्ये सत्तेचा रक्तरंजित अध्याय! खामेनींची हत्या इराणी राजवटीचे काळे पर्व; कोण होणार इराणचा नवा ‘सुलतान’?

क्रांतीचा वणवा आणि ६ वेळा तुरुंगवास

१९६० च्या दशकात इराणवर शहा (Shah of Iran) यांचे राज्य होते. शहा यांच्या पाश्चात्य धोरणांविरुद्ध खामेनी यांनी बंडाचे निशाण फडकवले. शहा यांच्या गुप्तचर पोलिसांनी खामेनी यांना सहा वेळा अटक केली आणि भीषण छळ केला. तरीही खामेनी डगमगले नाहीत. १९७९ ची ऐतिहासिक ‘इस्लामिक क्रांती’ यशस्वी झाल्यानंतर खामेनी हे नवीन सरकारचे सर्वात विश्वसनीय आधारस्तंभ म्हणून पुढे आले.

प्राणघातक हल्ला आणि निकामी झालेला हात

खामेनींच्या आयुष्यात १९८१ हे वर्ष अत्यंत कठीण होते. एका पत्रकार परिषदेत त्यांच्यावर बॉम्ब हल्ला झाला. या स्फोटात ते थोडक्यात बचावले, पण त्यांचा उजवा हात कायमचा अर्धांगवायूने निकामी झाला. आजही त्यांचे अनेक फोटो पाहिले तर त्यांचा उजवा हात स्थिर दिसतो, तो याच हल्ल्याची खूण आहे. या घटनेनंतर काही काळातच त्यांनी इराणचे अध्यक्षपद भूषवले आणि इराकसोबतच्या भीषण युद्धात देशाला खंबीर नेतृत्व दिले.

When a kid told Iran Supreme Leader Late Ali #Khamenei that he wants to get martyred, Ali Khamenai told him to study first, become a scientist , live your life and then when you turn old and frail, then die. Today, he refused to leave his home and hide while the US and Israel… pic.twitter.com/dtdTxGOKia — Roshan Rai (@RoshanKrRaii) March 1, 2026

credit – social media and Twitter

सर्वोच्च नेते आणि अण्वस्त्रांचे स्वप्न

१९८९ मध्ये इराणचे संस्थापक अयातुल्ला खोमेनी यांच्या निधनानंतर खामेनी यांची ‘सर्वोच्च नेते’ (Supreme Leader) म्हणून निवड झाली. गेली ३७ वर्षे त्यांनी इराणमधील प्रत्येक लहान-मोठ्या निर्णयावर आपले नियंत्रण ठेवले. इराणला अण्वस्त्रधारी देश बनवण्यासाठी त्यांनी पाश्चात्य देशांच्या निर्बंधांची पर्वा केली नाही. त्यांची प्रतिमा एक कट्टरपंथी आणि कधीही न झुकणारा नेता अशी होती. त्यांच्या शब्दाला इराणमध्ये देवाच्या शब्दासारखी मान्यता होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Khamenei Assassination: खामेनींच्या हत्येचा ‘खलनायक’ सौदी अरेबिया? ट्रम्प आणि MBS यांच्यातील ‘गुप्त’ फोन कॉलने चर्चेला उधाण

हल्ल्यात संपूर्ण कुटुंब संपले; ४० दिवसांचा शोक

यावेळचा इस्रायली हल्ला खामेनी यांच्यासाठी काळ ठरला. या हल्ल्यात केवळ खामेनींचा मृत्यू झाला नाही, तर त्यांच्यासोबत त्यांची मुलगी, जावई आणि त्यांचा निष्पाप नातूही मारला गेला. या कौटुंबिक शोकांतिकेमुळे संपूर्ण इराण सुन्न झाला आहे. सरकारने ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला असून, मोज्तबा खामेनी किंवा हसन खोमेनी यांच्यापैकी कोणाची तरी पुढील सर्वोच्च नेते म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. इराणच्या इतिहासातील एक मोठे प्रकरण आज कायमचे बंद झाले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अयातुल्ला अली खामेनी इराणचे सर्वोच्च नेते कधी बनले?

    Ans: १९८९ मध्ये इराणचे पहिले सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या निधनानंतर अली खामेनी यांची या पदावर नियुक्ती झाली.

  • Que: खामेनी यांच्या उजव्या हाताला काय झाले होते?

    Ans: १९८१ मध्ये एका पत्रकार परिषदेत झालेल्या बॉम्ब स्फोटात त्यांचा उजवा हात कायमचा अर्धांगवायूने निकामी झाला होता.

  • Que: खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये काय परिस्थिती आहे?

    Ans: इराणमध्ये ४० दिवसांचा शोक जाहीर झाला असून नवीन सर्वोच्च नेत्याची निवड करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Ali khamenei life story biography fromcleric to supreme leader of iran death news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

World War 3 : विनाशकारी युद्धाने इराण 12 वर्षे गेला मागे; ४० दिवसांच्या युद्धात २७० अब्ज डॉलर्सचे नुकसान
1

World War 3 : विनाशकारी युद्धाने इराण 12 वर्षे गेला मागे; ४० दिवसांच्या युद्धात २७० अब्ज डॉलर्सचे नुकसान

होर्मुझच्या सामुद्रधुनीमुळे वाद आणखी चिघळला! युद्धविराम झाला असताना देखील तेलसंकट कायम
2

होर्मुझच्या सामुद्रधुनीमुळे वाद आणखी चिघळला! युद्धविराम झाला असताना देखील तेलसंकट कायम

Fuel Supply Update : US Iran यांच्या चर्चेतून तोडगा नाही! इंधनाचा तुटवडा पुन्हा भासणार? सरकारने जनतेला केलं ‘हे’ आवाहन
3

Fuel Supply Update : US Iran यांच्या चर्चेतून तोडगा नाही! इंधनाचा तुटवडा पुन्हा भासणार? सरकारने जनतेला केलं ‘हे’ आवाहन

Mutual Fund Data : अस्थिरतेच्या काळातही Investment कडे जोर कायम; Equity Funds मध्ये 56% वाढ
4

Mutual Fund Data : अस्थिरतेच्या काळातही Investment कडे जोर कायम; Equity Funds मध्ये 56% वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.