इंदूरचे पराक्रमी नेतृत्व मल्हारराव होळकर यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
मल्हारराव होळकर हे मराठा साम्राज्यातील पराक्रमी सरदार आणि इंदूर संस्थानाचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. १६ मार्च १६९३ रोजी त्यांचा जन्म झाला. साध्या धनगर कुटुंबात जन्म असूनही त्यांच्या धैर्य, बुद्धिमत्ता आणि नेतृत्वगुणांमुळे त्यांनी मराठा साम्राज्यात महत्त्वाचे स्थान मिळवले. पहिले बाजीराव यांच्या काळात मल्हारराव होळकर यांनी अनेक मोहिमांमध्ये पराक्रम गाजवला. उत्तरेकडील मोहिमांमध्ये त्यांनी मराठा साम्राज्याचा प्रभाव वाढवण्यास मोठे योगदान दिले. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना मालवा प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली आणि पुढे त्यांनी इंदूर संस्थानाची मजबूत पायाभरणी केली. (Dinvishesh)
16 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
16 मार्च रोजी जन्म दिनविशेष
16 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष






