ट्रम्पच्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेत मंदी येणार? काय असेल 'मेक द अमेरिका ग्रेट अगेन' धोरणाचे भविष्य (फोटो सौजन्य: टीम नवराष्ट्र)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (02 एप्रिल) अखेर टॅरिफ बॉम्ब फोडला. जवळपास 180 देशांवर त्यांनी भारी टॅरिफ लागू केले. मात्र ट्रम्प यांच्या धोरणामुळे जागतिक व्यापार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या बेताल धोरणामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मात्र, ट्रम्प यांच्या या नव्या धोरणांमुळे अमेरिका मंदीच्या गर्तेत जाण्याची शक्यता आहे. असे असेल तर ‘मेक द अमेरिका ग्रेट अगेन’ या ट्रम्प यांच्या धोरणाचे भविष्य काय असेल? असा प्रश्न उपस्थित होतो. मंदीचा धोका ओळकून, गुंतवमूक बॅंंक गोल्डमन सॅक्सने 25 दिवसांच्या आत त्यांचे अंदाज सुधारित केले आहेत यापूर्वी बॅंकेने मंदीचा अंदाज 15 टक्क्यांवरुन 20 टक्के केला होता, आमि आता तो 35 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
यामागचे कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संबंधित घोषणा आणि कडक धोरणांमुळे शेअर बाजारावर नकारात्क परिणाम झाला आहे. तसेच बांधकाम रोजगारालाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. भविष्यात महागाई आणि विनिमय दरांवरही मोठा परिणा होऊ शकतो. मार्च महिन्याच्या सुरुवातील, गोल्डमन सॅक्सने म्हटले होते की, मंदीला टाळता येणे शक्य नाही, परिस्थिती वाईट झाले की ट्रम्प प्रशासन मागे हटेल अशी अटकळ आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाने माघार घेतली नाही तर मंदी अधिक वाढण्याची शक्यता आहे.
सध्या सर्व बाजूंनी ट्रम्प यांना आर्थिक मंदीबाबत इशारे मिळाले असूनही ते त्यांच्या टॅरिफ धोरणांवर ठाम आहेत. अमेरिकेची व्यापार तूट भरून काढण्यासाठी त्यांनी परस्पर शुल्क जाहीर केले आहे. अर्थतज्ज्ञांचे म्हणण्यानुसार, असे केल्याने अमेरिकेत महागाई वाढेल, वस्तूंची मागणी कमी होईल आणि देशांतर्गत खर्च कमी होईल. परंतु याचा परिणाम असा होईल की बांधकाम कमी होईल आणि बेरोजगारी वाढेल. असे झाल्यास, अमेरिकेत यावर्षी जीडीपी फक्त 1 टक्के वाढण्याची अपेक्षा आहे आणि बेरोजगारी 4.5 टक्क्यांपर्यंत वाढम्याची शक्यता आहे. यामुळे, ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण स्वतःचे ध्येय साध्य करणार आहे किंवा स्वतःचे नुकसान करणार आहे. यामुळे विकासदर मंदावेल आणि चलनवाढीत तीव्र वाढ होईल, याला स्टॅगफ्लेशन म्हणतात.
1980 नंतर अशी परिस्थिती कधीच आली नाही. मात्र अलिकडच्या गॅलप पोलनुसार, ट्रम्प यांचे समर्थकही त्यांच्या कामाच्या नीतिमत्तेवर नाराज आहेत. जानेवारीमध्ये ट्रम्प यांनी पदभार स्वीकारला तेव्हा त्यांना 47 टक्के पाठिंबा होता, पण फेब्रुवारीमध्ये 45 टक्क्यांवर घसरला आहे. मार्चच्या मध्यात, हा आधार 43 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. सध्या अमेरिकन ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, कारण ते भारत, बांगलादेश, चीन, मलेशिया इत्यादी देशांमधून आयात केलेले उत्पादनांचा वापर अमेरिकन कंपन्या करतात.
डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचंड प्रमाणात परस्पर कर लागू केला असून याची अमेरिकेला जास्त किंमत मोजावी लागणार आहे. अमेरिका हा ग्राहक-केंद्रिक अर्थव्यवस्था असलेला देशा आहे. बेरोजगारीच्या भितीने लोकांनी खर्च कमी केला तर याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या घोषणेमुळे सध्या शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण झाली आहे. टॅरिफ धोरणाचा भारतातील उद्योग आणि शेतीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो.