SCO Summit 2025: जग नवा अध्याय लिहिताना! 'ड्रॅगन आणि हत्ती एकत्र येणे महत्वाचे' शी जिनपिंग यांनी मोदींची केली प्रशंसा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
SCO Summit 2025 : सात वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये पोहोचले आणि शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत सहभागी झाले. या भेटीमुळे भारत-चीन संबंधांमध्ये नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मोदींचे स्वागत करताना स्पष्ट शब्दांत सांगितले “ड्रॅगन आणि हत्ती एकत्र आले तर आशिया आणि जगात शांतता व समृद्धीची नवी दिशा मिळेल.”
या वर्षी भारत-चीन राजनैतिक संबंधांचा ७५वा वर्धापन दिन साजरा होत आहे. शी जिनपिंग यांनी या ऐतिहासिक क्षणी दोन्ही देशांनी आपले संबंध दीर्घकालीन व धोरणात्मक दृष्टिकोनातून हाताळण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले “बहुपक्षीयता, बहुध्रुवीय जग आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये अधिक लोकशाही टिकवण्याची जबाबदारी भारत आणि चीनची आहे. या भूमिकेतूनच आशिया तसेच संपूर्ण जगासाठी स्थिरता निर्माण करता येईल.”
#WATCH | Tianjin, China: During his bilateral meeting with PM Narendra Modi, Chinese President Xi Jinping says, “… China and India are two ancient civilisations in the East. We are the world’s two most populous countries, and we are also important members of the Global South.… pic.twitter.com/uJV595g54i
— ANI (@ANI) August 31, 2025
credit : social media
चर्चेदरम्यान शी जिनपिंग यांनी भारताला ‘हत्ती’ तर चीनला ‘ड्रॅगन’ या प्रतिमांमध्ये पाहिले. ते म्हणाले “आपण जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहोत. अशा परिस्थितीत, एक चांगला शेजारी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ड्रॅगन आणि हत्ती एकत्र आले, तर ते संपूर्ण जगासाठी आशेचा किरण ठरेल.” हा उल्लेख केवळ राजनैतिक भाषण नव्हता, तर दोन प्राचीन संस्कृतींमधील सहकार्य व परस्पर आदराचा नवा संदेश होता.
या बैठकीत पंतप्रधान मोदींनी चीनकडे तीन शब्दांत स्पष्ट संदेश दिला विश्वास, आदर आणि संवेदनशीलता. मोदींचा हा मोलाचा उच्चार म्हणजे, भारताचे परराष्ट्र धोरण केवळ औपचारिकतेवर नाही तर परस्पर विश्वासावर आधारलेले आहे, याचा ठोस इशारा होता. त्यांनी चीनला हे अधोरेखित केले की, या तीन गोष्टींवरच खरी भागीदारी उभी राहू शकते. अन्यथा दोन्ही देशांतील मतभेद अधिक गहिरे होण्याची शक्यता राहते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : SCO Tianjin Summit 2025 : PM मोदींचे चीनमध्ये ग्रँड वेलकम; जिनपिंग-पुतिन यांच्याशी होणार महत्त्वपूर्ण चर्चा
शांघाय सहकार्य संघटना म्हणजे आशियातील सर्वात मोठ्या बहुपक्षीय गटांपैकी एक. भारत आणि चीनसह रशिया, पाकिस्तान, मध्य आशियातील देश या संघटनेचे सदस्य आहेत. या व्यासपीठावरून केवळ सुरक्षा आणि व्यापारच नव्हे तर सांस्कृतिक संबंध, तंत्रज्ञान सहकार्य, ऊर्जा सुरक्षेचे मुद्दे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावरही व्यापक चर्चा होते. त्यामुळे या परिषदेत मोदी-जिनपिंगची भेट आशियाई स्थिरतेसाठी मोठा टप्पा मानली जात आहे.
सीमेवरील तणाव, व्यापारी संघर्ष आणि जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत-चीन संबंधांमध्ये अनेक चढउतार झाले आहेत. मात्र, दोन्ही देशांच्या नेत्यांच्या भेटी नेहमीच नवा मार्ग दाखवतात.
मोदींच्या भेटीनंतर दोन मुद्दे ठळकपणे पुढे आले –
स्थिर शेजारधोरण : दोन्ही देशांनी परस्परांवरील अविश्वास दूर करणे आवश्यक.
आशियाई नेतृत्व : जग बहुध्रुवीय बनत असताना भारत-चीन सहकार्याची गरज अधिक भासते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : SCO Tianjin Summit 2025 : SCO शिखर परिषदेत पाहुण्यांचे स्वागत करण्यापासून ते बसवण्यापर्यंत ‘रोबोट’च करणार पाहुणचार
शी जिनपिंग यांनी उद्घाटन भाषणात सांगितले “जग एका मोठ्या बदलाकडे वाटचाल करत आहे. या संक्रमणकाळात भारत आणि चीनने हातात हात घालणे म्हणजे केवळ दोन देशांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक सकारात्मक पाऊल ठरेल.” मोदी-जिनपिंगची ही भेट केवळ औपचारिक नव्हे तर आशियाच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. विश्वास, आदर आणि संवेदनशीलता या तीन मूल्यांवर आधारित भारत-चीन संबंध जर प्रामाणिकपणे उभे राहिले, तर ‘ड्रॅगन आणि हत्ती’ची हातमिळवणी जागतिक शांतता आणि प्रगतीसाठी ऐतिहासिक ठरेल.