जागतिक वारसा स्थळ असलेला झाला होता लाल किल्ला बांधून जाणून घ्या 13 एप्रिलचा इतिहास (फोटो - सोशल मीडिया)
दिल्लीतील लाल किल्ला आज फक्त देशामध्ये नाही तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. पाचव्या मुघल सम्राटाची राजधानी असलेल्या शाहजहानाबादच्या राजवाड्याच्या रूपात बांधलेला हा किल्ला इतिहासातील महत्त्वाचा स्मारक आहे. सम्राट शाहजहानने लाल किल्ला बांधला होता. या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लाल वाळूच्या दगडामुळे या किल्ल्याला लाल किल्ला असे म्हणतात. दिल्लीतील लाल किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून देखील ओळखला गेला आहे. आजच्या दिवशी 1648 मध्ये लाल किल्ला बांधण्यात आला होता. आजही या किल्ल्यातील शिल्पकला सर्वांना आकर्षित करते.






