संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या सर्वोच्च महिला राजनैतिक अधिकारी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आज डिप्लोमसी आणि राजकारणातील महिलांचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. हा दिवस दरवर्षी जून २४ रोजी साजरा करण्यात येतो. अलीकडच्या काळात महिला सर्वत्र क्षेत्रात बाजी मारताना दिसत आहेत. अगदी राजकारण आणि मुत्सद्देगिरी (Diplomacy) क्षेत्रातही महिलांचे मोठे योगदान आहे. आज जागतिक पातळीवर अनेक महिला आपल्या देशाचे नेतृत्त्व करताना दिसत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि महिलांच्या नेतृत्त्वाला चालना देण्यासाठीच संयुक्त राष्ट्र संघाने २४ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला राजनैतिक दिन म्हणून घोषित केला.
यावेळी आंतरराष्ट्रीय महिला राजनैतिक आणि मुत्सद्देगिरीची थीम खूप खास आहे. आजच्या दिवसाचा उद्देश मुत्सद्देगिरीतील आणि राजकारणातील महिलांच्या नेतृत्वालातील अडथळे दूर करणे आहे. यामुळे महिलांना प्रतिनिधीत्वासाठी अधिक संधी मिळले.
मंत्रीगण शेवटी काम करणार तरी कसं? सहाय्यकाशिवाय नेत्यांचं चालणार कसं?
तसे पाहायला गेले तर गेल्या अनेक काळापासून राजनैतिकतेवर पुरषांचे वर्चस्व राहिले आहे. लिंग समानतेसाठी जागतिक वचनबद्धता असूनही पुरुषांनी राजकारण गाजवले आहे. परंतु आजच्या काळात महिला देखील राजनैतिर आणि राजकीय नेतृत्त्वात आघाडीवर आहे.
परंतु संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, जानेवारी २०२५ पर्यंत केवळ २५ देशांमध्ये महिला राष्ट्रप्रमुख आहेत. तसेच जागतिक मंत्रिमंडळात केवळ २२.९% महिलांचा समावेश आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. यामुळेच आजा आंतरराष्ट्रीय महिला राजनैतिक दिवस साजरा केला जात आहे. महिलांच्या नेतृत्वात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
यामुळे या दिवशी संयुक्त राष्ट्रांनी सर्व सदस्य राष्ट्रांना, NGO संस्थांना, शैक्षिणक संस्थाना व महिला संघटनाना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. २०२५ मध्ये महिला मुत्सद्दी राष्ट्रीय धोरण आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी यांच्यातील दरी भरुन काढणे आणि महिलांच्या भूमिकेला पाठिंबा देणे महत्वपूर्ण आहे.
संयुक्त राष्ट्रांमध्ये काही भारतीय महिला आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व गाजवत आहेत. यामध्ये स्नेहा दुबे, रुचिरा कांबोज , विदिशा मैत्रा आणि पौलौमी त्रिपाठी या महिलांनी जागतिक व्यासपीठीवर भारताचे नेतृत्व केले आहे. या महिलांचे कार्य महिला सक्षणीकरणासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
Ashadhi Wari 2025 : पालखी सोहळ्यातील हिंदू मुस्लीम सौहार्दचे प्रतिक : देहूमधील अनगडबाबा शाह दर्गा