Earning From Instagram: कोणत्या देशातील लोक करतात इन्स्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई? जाणून घ्या भारताची स्थिती ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Instagram earnings by country : आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. विशेषतः इन्स्टाग्राम (Instagram) हे प्लॅटफॉर्म तर जगभरात कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे. केवळ फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्यासाठीच नव्हे, तर इन्स्टाग्राम आता लाखो लोकांसाठी मोठ्या कमाईचे साधन बनले आहे. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की सेलिब्रिटी, क्रिएटर्स किंवा इन्फ्लुएन्सर्स त्यांच्या प्रत्येक पोस्टसाठी लाखो रुपये कमावतात. पण प्रश्न असा आहे की जगातील कोणत्या देशातील लोकांना इन्स्टाग्रामकडून सर्वाधिक पैसे मिळतात? चला तर जाणून घेऊया या आकर्षक कमाईमागचं रहस्य.
जागतिक अहवाल आणि अभ्यासांनुसार, अमेरिका हा असा देश आहे जिथे इन्स्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई केली जाते. अमेरिकेतील मोठं डिजिटल मार्केट, जागतिक दर्जाच्या जाहिरात एजन्सीज आणि ब्रँड्सच्या अफाट गुंतवणुकीमुळे तेथील क्रिएटर्सना जगातील सर्वाधिक पेमेंट मिळतं. इन्स्टाग्रामवरील कमाई CPM (Cost Per Mille) म्हणजेच प्रति १००० व्ह्यूज जाहिरातीच्या किंमतीवर अवलंबून असते. अमेरिकेत हा CPM ३ डॉलर ते ८ डॉलर इतका असतो. याचा साधा अर्थ असा की, जर एखाद्या अमेरिकन इन्फ्लुएन्सरच्या व्हिडिओला १० लाख व्ह्यूज मिळाले, तर त्याची कमाई थेट लाखो रुपयांमध्ये जाऊ शकते. उदाहरणार्थ, अमेरिकेत एखाद्या क्रिएटरला एका पोस्टसाठी साधारणतः १०,००० ते २५,००० डॉलर्सपर्यंत मिळतात. म्हणजेच भारतीय चलनात लाखो-कोट्यवधी रुपये.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kim Jong Un China visit : अमेरिकेने तयार राहावे! किम जोंग उन चीन दौऱ्यावर; पुतिनही राहणार उपस्थित
अमेरिकेनंतर कॅनडा आणि युनायटेड किंगडम (UK) या देशांचा क्रम लागतो. येथे सरासरी CPM २.५ ते ६ डॉलर दरम्यान असतो. म्हणजेच या देशांतील निर्मात्यांनाही चांगली कमाई होते, जरी ती अमेरिकेपेक्षा थोडी कमी असते.
भारत, ब्राझील, इंडोनेशिया आणि इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये इन्स्टाग्रामची लोकप्रियता प्रचंड आहे. परंतु येथे जाहिरातींवर खर्च होणारी रक्कम कमी असल्याने CPM देखील कमी असतो. भारतात एखाद्या क्रिएटरकडे १० लाख फॉलोअर्स असले तरी त्याला प्रति पोस्ट २००० ते ८००० डॉलर्स इतकीच कमाई होते. हे अमेरिकन क्रिएटर्सच्या तुलनेत खूप कमी आहे. तरीसुद्धा भारतातील डिजिटल इन्फ्लुएन्सर्सच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे आणि ब्रँड्सदेखील हळूहळू मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू लागले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्पच्या ‘या’ दोन चुकांमुळे भारत-चीन आले जवळ; जिनपिंग यांनी भारताला लिहिलेल्या पत्रातील ‘गुपिते’ आली समोर
इन्स्टाग्रामवरील सर्वात जास्त कमाई करणाऱ्यांमध्ये जागतिक सेलिब्रिटींचा मोठा वाटा आहे. हॉलीवूड स्टार्स, आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू, पॉप सिंगर्स आणि टॉप मॉडेल्स यांच्या एका पोस्टसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. एका अभ्यासानुसार, जगभरातील २२ टक्के प्रायोजित पोस्ट फक्त अमेरिकेतून येतात. यावरून लक्षात येते की ब्रँड्स सर्वाधिक पैसे अमेरिकन इन्फ्लुएन्सर्सना देतात.