सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शदर पवारांच्या राष्ट्रवादीचे कोथरुड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी पुणे शहरातील तसेच कोथरुडमधील अनेक मुद्द्यावर नवराष्ट्रसोबत संवाद साधला. वाढत्या गुन्हेगारीवरुनही गुरनानी यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
गुरनानी म्हणाले, माझ्या प्रभागात गुजरात कॉलनी आणि आझाद नगर या ठिकाणी वाहतुकीची समस्या आणि अतिक्रमक हे मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. लोकांना रस्त्यावर चालायची सोय नाही. नागरिकांनी नेमकं चालायचं कस ? याविषयी मी प्रशासनाकडे वेळोवेळी समस्या सांगितल्या. तसेच कोथरुडमधील थोरात उद्यानजवळ मोनोरेल प्रकल्प करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. यामुळे आम्ही सर्व नाकरिकांनी एकत्र येत मोठं जनआंदोलन केलं आणि मोनोरेल प्रकल्प बंद पाडला. प्रल्प बंद पाडण्यात आमच्या पक्षाची महत्वाची भुमिका आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नागरिक माझ्या बाजूने उभे राहतील.
नगरसेवक झालात तर कोथरुडमध्ये काय बदल करणार ? या प्रश्नावर बोलताना गुरनानी म्हणाले, कोथरुडमध्ये मला ३ महत्वाचे कामे करायचे आहेत. युवक आणि विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानच नाही. या प्रभागातील अनेक लोकांनी सत्ता उद्भवली पण कोणालाही हा प्रश्न मनात आला नाही. त्यामुळे मी नगरसेवक झालो तर सुरुवातीला खेळाचे मैदान करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. दर वर्षाला माझ्या प्रभागात मी रोजगार मेळावा घेत असतो. भाजप सरकार आल्यापासून बेरोजगारी वाढलेली आहे. त्यामुळे युवकांना कसा रोजगार देता येईल, यावर माझा भर असणार आहे आणि प्रभागातील अतिक्रमण कसं थांबवता येईल, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच जनतेच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असं गिरीश गुरनानी यांनी सांगितलं.
वाढत्या गुन्हेगारीवर बोलताना गुन्हेगारी म्हणाले, या बाहुबिजेला मी पोलीस निरिक्षकांची भेट घेतली. त्यांना आम्ही सांगितलं की जे राज्यकर्ते गुंडाना खतपाणी घालत आहेत. तुम्ही त्यांच्या प्रेशरला बळी पडू नका. राज्यकर्ते गुंडांना खतपाणी घालतात म्हणून गुंडांना माज येतो. पोलीस निरिक्षकांना पत्र दिलं. आज मी सत्तेत नाही. विरोधी पक्षात आहे. पण मी पोलिसांना पत्र देऊन गुन्हेगारी थांबण्यासाठी प्रयत्न करतोय. पण कोथरुडमधील सत्ताधाऱ्यांना हे वाढलेली गुन्हेगारी दिसत नाही का? कोथरुडमध्ये दोन खासदार आहेत. एक केंद्रीय मंत्री आहेत. आणि एक राज्याचे मंत्री आहेत. एवढे मोठे नेते असताना गुन्हेगारी डोकं वर काढत आहे, म्हणजे कोथरुडमधील सत्ताधारी नेत्यांचे अपयश म्हणावं लागेल. जो समाजात तेढ निर्माण करतो, जो समाजात गुंडागर्दी पसरवतो त्या लोकांना आपण पाठीशी घालायच नाही. ही भुमिका सर्व राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे, असं यावेळी गुरनानी म्हणाले. आमच्याकडे सत्ता आली तर कुठल्याही गुंडांना पाठिशी घालणार नाही, त्यांना कडक शासन झालं पाहिजे, यासाठीच प्रयत्न करणार, असंही गुरनानी म्हणाले.






