15 एप्रिल 1912रोजी अटलांटिक महासागराच्या बर्फाळ टायटॅनिक जहाज बुडाले (फोटो - टीम नवराष्ट्र)
जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात हे जहाज माहिती नाही असा मनुष्य सापडणार आहे. टायटॅनिक जहाज आणि त्याचा झालेला अपघात हे एक दुर्दैवी इतिहासापैकी एक आहे. 15 एप्रिल रोजी 1912 मध्ये उत्तर अटलांटिकच्या बर्फाळ पाण्यात टायटॅनिक जहाज बुडाले. या अपघातामध्ये दीड हजारहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला. यामुळे आजचा दिवस हा टायटॅनिक स्मृति दिन म्हणून लक्षात ठेवला जातो. या अपघातामध्ये बुडून जीव गमावलेल्या 1500 जीवांचे स्मरण करतो. “बुडणारे जहाज” म्हणून ओळखले जाणारे टायटॅनिक 14 एप्रिल 1912 रोजी रात्री 11.40 वाजता इंग्लंडहून न्यू यॉर्क शहराच्या पहिल्या प्रवासात एका हिमनगाला धडकले. नंतर, 15 एप्रिल रोजी अटलांटिक महासागराच्या बर्फाळ पाण्यात, टायटॅनिक बुडाले. जहाजावर पुरेशा संख्येने लाईफबोट्स नसल्याने अनेकांचा बुडून मृत्यू झाला होता.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा






