• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • महाराष्ट्र
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • ठाणे
  • देश
  • मराठी सिनेमा
  • विदेश
  • लाइफ स्टाइल
  • व्यापार
  • वेब स्टोरीज
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Quiet Day World Peace Day Is A Day Of Introspection And Mental Stability Nrhp

Quiet Day : जागतिक शांतता दिन म्हणजे आत्मसंवादाचा आणि मानसिक स्थैर्याचा दिवस

Quiet Day : गोंगाट आणि धावपळीच्या युगात शांततेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 25 फेब्रुवारी हा शांतता दिन (Quiet Day) म्हणून साजरा केला जातो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 25, 2025 | 09:20 AM
Quiet Day World Peace Day is a day of introspection and mental stability

Quiet Day : जागतिक शांतता दिन म्हणजे आत्मसंवादाचा आणि मानसिक स्थैर्याचा दिवस ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली : गोंगाट आणि धावपळीच्या युगात शांततेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 25 फेब्रुवारी हा शांतता दिन (Quiet Day) म्हणून साजरा केला जातो. आधुनिक जीवनशैलीमध्ये सततच्या आवाजांमध्ये वावरणे अपरिहार्य झाले आहे. कामाच्या ठिकाणी असो, गर्दीच्या रस्त्यांवर, घरी टीव्ही किंवा मोबाइलच्या सततच्या वापरामुळे, सर्वत्र निनाद आहे. अशा परिस्थितीत, काही काळ थांबून शांततेच्या आवाजाचे महत्त्व जाणणे आणि आत्मसंवाद साधणे गरजेचे आहे.

शांतता दिनाचे महत्त्व आणि इतिहास

प्राचीन काळापासून शांततेला ध्यानधारणा आणि प्रार्थनेसाठी महत्त्वाचा घटक मानले गेले आहे. बहुतेक धर्मांमध्ये शांततेचा पुरस्कार केला जातो, कारण ती मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त असते. भारत आणि अनेक आशियाई देशांमध्ये विपश्यना ध्यानधारणा अत्यंत लोकप्रिय आहे. ‘विपश्यना’ म्हणजे ‘गोष्टी जशा आहेत तशा पाहणे’, ही बौद्ध परंपरेतील प्राचीन साधना आहे. या ध्यानशिबिरांमध्ये १० दिवसांपर्यंत शांततेत वेळ घालवण्याचा नियम असतो, ज्यामुळे मन अधिक स्थिर होते आणि आत्मपरिक्षण करण्याची संधी मिळते.

शांततेचे फायदे

शांतता ही केवळ बाह्य आवाजांपासून दूर जाणे नाही, तर मनातील गोंधळ कमी करून स्वच्छ विचार करण्याची संधी आहे. वैज्ञानिक संशोधनानुसार, शांततेत वेळ घालवणे हे मेंदूसाठी फायदेशीर ठरते. हे तणाव कमी करण्यास, लक्ष केंद्रित करण्यास आणि निर्णय क्षमतांमध्ये सुधारणा करण्यास मदत करते. तज्ज्ञांच्या मते, शांतता आपले जीवन अधिक अर्थपूर्ण आणि समृद्ध बनवू शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानचा घाणेरडा खेळ सुरू! चिकन नेकजवळ मिळाले रहस्यमई सिग्नल, ISIचा पर्दाफाश

शांतता दिन साजरा करण्याचे मार्ग

शांतता दिन फक्त एक दिवसापुरता मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनातही शांततेचे क्षण शोधणे गरजेचे आहे. या दिवशी खालील उपक्रम करून शांततेचा अनुभव घेता येऊ शकतो:

शांततेत काही वेळ घालवा – निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करा. उद्यानात फिरणे, झाडाखाली बसणे किंवा समुद्रकिनारी एकांतात वेळ घालवणे फायदेशीर ठरू शकते.

आवाज कमी करा – टीव्ही, मोबाईल, रेडिओ यांचा आवाज मर्यादित ठेवा. शक्य असल्यास, काही काळ फोन सायलेंटवर ठेऊन तंत्रज्ञानापासून दूर रहा.

Quiet Day World Peace Day is a day of introspection and mental stability

Quiet Day ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

ध्यानधारणा करा – ध्यान ही मन शांत ठेवण्याची प्रभावी पद्धत आहे. दिवसातील काही मिनिटे ध्यानासाठी देऊन मानसिक स्थिरता मिळवता येते. विपश्यना ध्यानशिबिराला जाणे शक्य नसल्यास, घरच्या घरीही ध्यान करण्याचा सराव सुरू करू शकता.

स्वतःला समजून घ्या – शांततेच्या दिवसाचा उपयोग आत्मचिंतनासाठी करा. आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा आणि मनाला सावरण्याचा प्रयत्न करा.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारत, चीन ते अमेरिकेपर्यंत… जर्मनीतील निवडणुकीच्या निकालाचा सर्वाधिक फटका कोणाला बसणार?

शांततेचा स्वीकार करा, अधिक समृद्ध जीवन जगा

आजच्या धकाधकीच्या जगात शांततेला दुर्लक्षित केले जाते. शांतता ही केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे, तर मानसिक आरोग्यासाठीही आवश्यक आहे. आपल्या दिनचर्येत काही क्षण शांततेसाठी राखून ठेवल्यास, आपण अधिक आनंदी, तणावरहित आणि स्थिर मानसिकतेचे जीवन जगू शकतो. २५ फेब्रुवारीचा हा दिवस आपल्याला शांततेचे महत्व पुन्हा नव्याने जाणून घेण्याची संधी देतो.

Web Title: Quiet day world peace day is a day of introspection and mental stability nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 09:20 AM

Topics:  

  • day history
  • lifestyle news
  • Peace of Mind

संबंधित बातम्या

5 सवयींनी दिवसाची करा सुरूवात; दिवसभर शरीरात सळसळेल एनर्जी; आजच करा दिनचर्या सुरू
1

5 सवयींनी दिवसाची करा सुरूवात; दिवसभर शरीरात सळसळेल एनर्जी; आजच करा दिनचर्या सुरू

साखरेला मुळापासून उपटून टाकतील स्वयंपाकघरातील या बिया; याचा प्रत्येक दाणा म्हणजे अमृत, आजपासूनच खा… डझनभर आजार होतील दूर
2

साखरेला मुळापासून उपटून टाकतील स्वयंपाकघरातील या बिया; याचा प्रत्येक दाणा म्हणजे अमृत, आजपासूनच खा… डझनभर आजार होतील दूर

Lifestyle News: 1 महिना गोड पदार्थ न खाल्ल्यास शरीरात होतील ‘हे’ अद्भुत बदल; दीर्घ आजार होतील छुमंतर
3

Lifestyle News: 1 महिना गोड पदार्थ न खाल्ल्यास शरीरात होतील ‘हे’ अद्भुत बदल; दीर्घ आजार होतील छुमंतर

International Literacy Day: डिजिटल युगात साक्षरता म्हणजे फक्त अक्षर-ओळख नसून संवाद, समज, सुरक्षितता आणि बदलाची शक्ती आहे
4

International Literacy Day: डिजिटल युगात साक्षरता म्हणजे फक्त अक्षर-ओळख नसून संवाद, समज, सुरक्षितता आणि बदलाची शक्ती आहे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कुर्डू गावातील मुरूम उपसा प्रकरणावर कारवाईचा बडगा; सरपंचसह ग्रामसेवकावर चोरीचा गुन्हा

कुर्डू गावातील मुरूम उपसा प्रकरणावर कारवाईचा बडगा; सरपंचसह ग्रामसेवकावर चोरीचा गुन्हा

Thane News : ठाण्यात एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

Thane News : ठाण्यात एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

लवकरच ‘या’ 5 Mid Size SUVs लाँच होण्याच्या तयारीत, MG Hector, Seltos सारख्या कारला मिळणार टक्कर

लवकरच ‘या’ 5 Mid Size SUVs लाँच होण्याच्या तयारीत, MG Hector, Seltos सारख्या कारला मिळणार टक्कर

Nepal Violence : हिंसक निदर्शनांचा फायदा घेत नेपाळच्या तुरुंगातून कैदी फरार; भारतात घुसखोरीचा प्रयत्नामुळे सीमेवर हाय अलर्ट

Nepal Violence : हिंसक निदर्शनांचा फायदा घेत नेपाळच्या तुरुंगातून कैदी फरार; भारतात घुसखोरीचा प्रयत्नामुळे सीमेवर हाय अलर्ट

VP Elections 2025:  उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही मते विकत घेतली गेली: ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा भाजपवर गंभीर आरोप

VP Elections 2025: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही मते विकत घेतली गेली: ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा भाजपवर गंभीर आरोप

IND vs UAE Head to Head: आज भारत-यूएई आमनेसामने; हेड टू हेड रेकाॅर्डमध्ये कोणाचं पारडं जड? वाचा एका क्लिकवर

IND vs UAE Head to Head: आज भारत-यूएई आमनेसामने; हेड टू हेड रेकाॅर्डमध्ये कोणाचं पारडं जड? वाचा एका क्लिकवर

Asia cup 2025 : UAE विरुद्धच्या सामन्यापूर्वी अभिषेक शर्माने फोडली ‘डरकाळी’; केली षटकरांची आतिषबाजी..

Asia cup 2025 : UAE विरुद्धच्या सामन्यापूर्वी अभिषेक शर्माने फोडली ‘डरकाळी’; केली षटकरांची आतिषबाजी..

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन

Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन

Wardha : विशेष जन सुरक्षा अधिनियम विरोधात वर्ध्यात सर्वपक्षीय धरणे आंदोलन

Wardha : विशेष जन सुरक्षा अधिनियम विरोधात वर्ध्यात सर्वपक्षीय धरणे आंदोलन

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.