(फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
आज राजा राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी आहे. ज्यांनी आपेल संपूर्ण जीवन लोककल्याणाचा व समाजाचा उद्धार करण्यासाठी अर्पण केले. ज्यांच्या कार्यामुळे त्यांना लोककल्याणकारी राजा म्हणून संबोधले जाते. त्यांचा जन्म २६ डून १८७४ मध्ये कागलच्या जहागीर घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई या दांपत्यांच्या पोटी झाली होता. शाहू महाराजांचे विचारे हे महात्मा फुले यांच्या विचारांनी प्ररिते होते. त्यांनी सक्तीच्या व मोफत शिक्षणाची गरज समाजाला पटवून दिली आणि कोल्हापूर संस्थेंत शिक्षणासाठी सवलती जाहीर केल्या. त्यांना शेतकऱ्यांचा खरा राजा म्हणूनही गौरवले जाते.
06 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
1542 : सेंट फ्रान्सिस झेवियरने गोव्याची तत्कालीन पोर्तुगीज राजधानी ओल्ड गोवा गाठला.
1632 : शाहजहान, बादशहा आणि आदिलशाह यांच्यात शहाजींचा पराभव करण्यासाठी तह झाला.
1818 : राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाल्या.
1840 : पेनी ब्लॅकचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसिध्द करण्यात आले.
1889 : पॅरिसमधील युनिव्हर्सल एक्स्पोझिशनमध्ये आयफेल टॉवर अधिकृतपणे लोकांसाठी खुला करण्यात आला आहे.
1949 : EDSAC, पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संग्रहित संगणक सॉफ्टवेअर सुरू झाले.
1954 : रॉजर बॅनिस्टर चार मिनिटांत मैल धावणारा पहिला व्यक्ती ठरला.
1994: इंग्लिश बे चॅनेल आणि इंग्लंडला फ्रान्सशी जोडणाऱ्या युरोटनेलचे उद्घाटन इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ II आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोइस मित्रा यांच्या हस्ते झाले.
1997: बँक ऑफ इंग्लंडला स्वायत्तता दिली.
1999 : महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.
2001 : पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीला भेट दिली. मशिदीला भेट देणारे ते पहिलेच पोप होते.
2002: भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे 31 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
06 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)
1856 : ‘सिग्मंड फ्रॉइड’ – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 23 सप्टेंबर 1939)
1861 : ‘मोतीलाल गंगाधर नेहरु’ – भारतीय राजनीतीज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 6 फेब्रुवारी 1931)
1920 : ‘बुलो सी. रानी’ – संगीतकार गायक यांचा जन्म. (मृत्यू: 24 मे 1993)
1940 : ‘अबन मिस्त्री’ – प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ यांचा जन्म.
1943 : ‘वीणा चंद्रकांत गावाणकर’ – लेखिका यांचा जन्म.
1951 : ‘लीला सॅमसन’ – भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका यांचा जन्म.
1953 : ‘टोनी ब्लेअर’ – ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष यांचा जन्म.
06 मे रोजी मृत्यू दिनविशेष
1589 : रामतनू पांडे ऊर्फ मोहमाद आट्टा खान तथा संगीतसम्राट तानसेन – अकबराच्या दरबारातील एक नवरत्न यांचे निधन.
1862 : ‘हेन्री थोरो’ – अमेरिकन लेखक व विचारवंत यांचे निधन. (जन्म: 12 जुलै 1817)
1922 : ‘छत्रपती शाहू महाराज’ – सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते यांचे निधन.
1946 : ‘भुलाभाई देसाई’ – राजनीतीज्ञ यांचे निधन. (जन्म: 13 ऑक्टोबर 1877)
1952 : ‘मारिया माँटेसरी’ – इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ यांचे निधन. (जन्म: 31 ऑगस्ट 1870)
1966 : ‘रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे’ – उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ यांचे निधन. (जन्म: 16 फेब्रुवारी 1876)
1995 : ‘आचार्य गोविंदराव गोसावी’ – प्रवचनकार, संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
1999 : ‘कृष्णाजी शंकर हिंगवे’ – पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य यांचे निधन.
2001 : ‘मालतीबाई बेडेकर’ – विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका यांचे पुणे यांचे निधन.






