फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पत्रकारितेच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी तुम्ही बारावी पूर्ण केल्यानंतर कोणत्याही नामांकित महाविद्यालयात किंवा विद्यापीठात बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन करू शकता. यानंतर तुम्ही मास्टर ऑफ जर्नालिझम देखील करू शकता. ज्यामुळे तुमची या क्षेत्रात पकड मजबूत होईल.
डिजिटल पत्रकारितेचे वैशिष्ट्य म्हणजे हे शिक्षण शैक्षणिकच क्षेत्रापुरते मर्यादित नाही तर बातमी लेखन, व्हिडिओ एडिटिंग, कॅमेरा हाताळणी, सोशल मीडिया व्यवस्थापन यासारख्या व्यवहारिक कौशल्यांपर्यंत विस्तारले आहे. या कौशल्यांमध्ये प्राविण्य मिळवल्यास इतर क्षेत्रात प्रगतीसाठी मार्ग खुले होतात.
Success Story : शेतकरी पुत्राची सीबीआयमध्ये भरारी! मोहित यादवची ही प्रेरणादायी गोष्ट वाचली का?
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. तुम्ही एखाद्या न्यूज वेबसाइटसाठी कंटेट रायटर, रिपोर्टर किंवा संपादक बनू शकता, तुम्ही टीव्ही चॅनलसाठी अँकर म्हणून काम करू शकता, यूट्यूब चॅनल सुरू करू शकता, डिजिटल मीडिया हाऊससाठी काम करू शकता, सोशल मीडिया मॅनेजर बनू शकता किंवा फ्रीलान्स पत्रकार म्हणूनही काम करू शकता. तुम्ही स्वत: पॉडकास्टिंग आणि ब्लॉगिंगमध्ये वेगळी ओळख निर्माण करू शकता.
Viral Video :परीक्षा केंद्रात विद्यार्थिनींचा विनयभंग? पाकिस्तानातील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल!
अनेक विद्यार्थी ज्यांनी बीजेएमसी किंवा एमजेएमसी पूर्ण केलेले नाही. परंतु वेगळ्या अभ्यासक्रमातून पदवी प्राप्त केली आहे. त्यांना अनेकदा प्रश्न पडतो की, ते डिजिटल पत्रकारितेत करिअर करू शकतात का ? पण त्यांनी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, माध्यम संस्था आता पदवीपेक्षा कौशल्ये आणि कामाच्या अनुभवाला प्राधान्य देतात. त्यामुळे तुमची कौशल्ये सुधारणे आणि सातत्याने सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे.






