स्वामी विवेकानंदच्या पहिल्या महिला शिष्या भगिनी निवेदिता यांचा जन्मदिन असतो (फोटो सौजन्य - टीम नवराष्ट्र)
स्वामी विवेकानंद यांनी देशामध्ये केलेल्या कार्याने अनेकांची आयुष्य उजळून निघाली आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या पहिल्या महिला शिष्य या भगिनी निवेदिता होत्या. आयर्लंडमध्ये जन्मलेल्या मार्गारेट नोबल यांनी लंडनमध्ये शिक्षिका म्हणून काम केले होते. मात्र यानंतर त्यांना भारताची ओढ लागली. १८९८ मध्ये त्या भारतात आल्या आणि स्वामी विवेकानंदांनी त्यांना ‘निवेदिता’ हे नाव दिले, ज्याचा अर्थ ‘देवाला समर्पित’ असा आहे. आजच्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. भगिनी निवेदिता या मूळच्या आयरिश होत्या. २८ ऑक्टोबर १८६७ रोजी आयर्लंडमध्ये त्यांचा जन्म झाला होता. आजही स्वामी विवेकानंदाचा उल्लेख आल्यानंतर भगिनी निवेदिता यांचा आवर्जुन उल्लेख येतो.
28 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
28 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
28 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष






