छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झा राजे जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला होता (फोटो - टीम नवराष्ट्र)
रयतेच्या हिताचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य दर्शवणाऱ्या लढाया आजही सर्वांच्या स्मरणामध्ये आहे. कधी गनिमी कावा वापरुन तर कधी थेट हल्ला करुन छत्रपती शिवराय आणि मावळांनी स्वराज्य निर्माण केले. अशीच एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे पुरंदरचा तह. आजच्या दिवशी पुरंदरचा तह १६६५ मध्ये झाला, जो छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सेनापती जयसिंग यांच्यात झाला होता. मुघलांनी पुरंदर किल्ल्याला वेढा दिला होता. यानंतर झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये या तहाच्या अटींमध्ये शिवाजी महाराजांनी २३ किल्ले मुघलांना देण्यास आणि उर्वरित १२ किल्ल्यांवर नियंत्रण ठेवण्यास मान्यता दिली. या तहामुळे शिवाजी महाराजांनी काही किल्ले मुघलांना देण्यास आणि काही काळ शांतता राखण्यास मान्यता दिली






