फोटो सौजन्य - Social Media
‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं प्रवीणचं स्वप्न!
प्रवीण त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी विविध वाहिन्यांना मुलाखती देण्यात सध्या व्यस्थ आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनेला मुलखात देत असताना त्याने Biopic या विषयावर चर्चा केली आहे. तसेच त्याने त्याला आणखीन कोणत्या राजकीय नेत्यांवर Biopic करायला आवडेल, ते ही स्पष्ट केले आहे. प्रवीण म्हणतो की, “मला आणखीन दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढायला नक्की आवडेल: पतंगराव कदम आणि अजित पवार!”
पार्थ पवारांसोबत आलेला अनुभव!
या मुलाखतीत प्रवीण तरडेंनी पार्थ पवारांसोबत आलेला अनुभव शेअर केला आहे. ते म्हणतात की, “पार्थ पवार हे प्रति अजित पवार आहेत. एकदा मी सहजच बसलो होतो आणि मागून अचानक अजित दादांनी कुणाला तरी हाक मारल्यासारखं जाणवलं. मी लगेच मागे वळून पाहिलं. मागे पार्थ पवार होते! अजित दादांसारखा बेधडकपणा त्यांच्या मुलामध्ये म्हणजेच पार्थमध्ये झळकतो.”
अजित पवारांच्या भूमिकेसाठी कुणाला करणार Cast?
जेव्हा प्रवीण तरडेंना विचारलं गेलं की “अजित दादांच्या भूमिकेसाठी तुम्हाला कोण योग्य वाटतं?” तेव्हा प्रवीण तरडे म्हणाले की, “हे लगेच सांगणे कठीण आहे. परंतु, दादांच्या भूमिकेसाठी अजित दादांसारखी चेहऱ्याची ठेवण असणारा तसेच त्यांच्यासारखा आवाज असणारा कुणी मोठा नटच या पात्रासाठी योग्य आहे.”






