• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • World Autism Awareness Day 2025 Autism Affects Behavior Differently Nrhp

World Autism Awareness Day : ऑटिझम म्हणजे काय, काय आहेत त्यावरील उपचार?

दरवर्षी 2 एप्रिल रोजी जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे लोकांमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) या न्यूरोलॉजिकल स्थितीबद्दल जागरूकता निर्माण करणे हे आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 02, 2025 | 09:11 AM
World Autism Awareness Day 2025 Autism affects behavior differently

World Autism Awareness Day : ऑटिझम म्हणजे काय, काय आहेत त्यावरील उपचार? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : दरवर्षी 2 एप्रिल रोजी जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे लोकांमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) या न्यूरोलॉजिकल स्थितीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि याबाबत समाजात सकारात्मक दृष्टीकोन विकसित करणे. ऑटिझम असलेल्या व्यक्तींना योग्य उपचार मिळावेत आणि समाजात त्यांना समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

ऑटिझम हा एक न्यूरोलॉजिकल विकार आहे जो माणसाच्या संवाद साधण्याच्या आणि सामाजिक वागणुकीवर परिणाम करतो. या विकाराची लक्षणे लहान वयातच दिसू लागतात. ऑटिझम असलेली मुले आणि प्रौढ इतर व्यक्तींपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि प्रतिसाद देतात. त्यांची शिकण्याची, संवाद साधण्याची आणि समाजात वावरण्याची पद्धत सामान्य लोकांपेक्षा भिन्न असते.

ऑटिझमची कारणे आणि सुरुवातीची लक्षणे

ऑटिझमचे नेमके कारण काय आहे, हे शास्त्रज्ञ अजूनही शोधत आहेत. मात्र, संशोधनानुसार आनुवंशिक घटक, पर्यावरणीय कारणे आणि मेंदूच्या विकसनातील असंतुलन यामुळे हा विकार उद्भवतो. ऑटिझम असलेल्या मुलांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. वेळीच योग्य उपचार आणि थेरपी केल्यास ही मुले स्वावलंबी जीवन जगू शकतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेचे शेती अनुदान आणि भारताची टैरिफ धोरणे यामागचं नेमकं वास्तव काय?

ऑटिझमची काही प्रमुख लक्षणे:

डोळ्यांशी संपर्क साधण्यास अडचण

इतरांशी संवाद साधण्यात किंवा भावना व्यक्त करण्यात अपयश

हस्तांदोलन किंवा हसण्यासारख्या साध्या कृतींना प्रतिसाद न देणे

भाषेच्या विकासात उशीर होणे किंवा संवादाच्या नवीन पद्धती विकसित करणे

एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे आणि तीच कृती सतत करणे

अचानक राग येणे किंवा सामाजिक परिस्थिती हाताळण्यात त्रास होणे

या लक्षणांमुळे मुलांचा शैक्षणिक आणि सामाजिक विकास प्रभावित होतो. त्यामुळे वेळीच निदान आणि उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

ऑटिझमवर उपचार आणि व्यवस्थापन

ऑटिझम पूर्णतः बरा होऊ शकत नाही, मात्र योग्य उपचार आणि थेरपीद्वारे त्याचे परिणाम नियंत्रित करता येतात. तद्य सांगतात की, ऑटिझमवर कोणतेही ठोस औषध नाही, मात्र विविध थेरपी आणि शिक्षण पद्धतींद्वारे रुग्णाचे जीवनमान सुधारता येते.

प्रमुख उपचार पद्धती:

वर्तणूक थेरपी (Behavioral Therapy): मुलांच्या वागणुकीतील सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करणारी पद्धत.

बोलण्याची थेरपी (Speech Therapy): संवाद कौशल्य सुधारण्यासाठी विशेष तज्ञांच्या मदतीने केली जाते.

व्यावसायिक थेरपी (Occupational Therapy): मुलांचे दैनंदिन कार्य कौशल्य वाढवण्यासाठी मदत करणारी पद्धत.

औषधोपचार: काही ठराविक प्रकरणांमध्ये लक्षणे सौम्य करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे दिली जातात.

पालक आणि शिक्षकांचे प्रशिक्षण: मुलांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना योग्य मार्गदर्शन दिल्यास ऑटिझम असलेल्या मुलांसाठी पोषक वातावरण तयार करता येते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भाजपाची मुस्लिमांना भेट मस्त, ‘सौगात-ए-मोदी’ हे नाव दिले भारदस्त !

समाजाची जबाबदारी आणि ऑटिझमबाबत सकारात्मक दृष्टीकोन

ऑटिझम असलेल्या व्यक्तींना समाजात योग्य स्थान मिळावे आणि त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांना मदत केली जावी, यासाठी समाजाचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. समाजाने ऑटिझमकडे केवळ एक आजार म्हणून न पाहता, ती एक वेगळी संज्ञात्मक क्षमता आहे हे स्वीकारणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालये आणि कार्यस्थळी ऑटिझमबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबवले पाहिजेत. पालकांनीही आपल्या मुलांच्या विकासाकडे लक्ष देऊन कोणतीही शंका असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 ऑटिझमबाबत संवेदनशीलता आणि जागरूकता हवी!

जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस हा केवळ एक औपचारिक दिवस नसून, समाजात ऑटिझम असलेल्या व्यक्तींना अधिक स्वीकारार्ह बनवण्याचा प्रयत्न करण्याचा दिवस आहे. ऑटिझम हा आजार नसून, ती एक वेगळी मेंदूची रचना आहे, हे समजून घेतल्यास या व्यक्तींना अधिक चांगले आयुष्य देता येईल.

“ऑटिझम असलेल्या व्यक्ती वेगळ्या असतात, पण त्यांची वेगळी असण्याची पद्धतच त्यांना अद्वितीय बनवते!”

टीप – वरील मजकूर सर्व सामान्य माहितीच्या आधारे लिहिला आहे. तरी उपचार घेण्यापूर्वी किवा सविस्तर माहितीसाठी डॉक्टरांचा किवा तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Web Title: World autism awareness day 2025 autism affects behavior differently nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 09:11 AM

Topics:  

  • Health Article
  • Health News
  • special news

संबंधित बातम्या

Khan Sir दान करणार मेंदू? असं करता येतं का? स्वतःच केला खुलासा, Video Viral
1

Khan Sir दान करणार मेंदू? असं करता येतं का? स्वतःच केला खुलासा, Video Viral

कुटुंबाला ठेवा सुरक्षित! जगभरात वाढतोय न्युमोकॉक्कल आजार, आरोग्यतज्ज्ञांनी दिला इशारा
2

कुटुंबाला ठेवा सुरक्षित! जगभरात वाढतोय न्युमोकॉक्कल आजार, आरोग्यतज्ज्ञांनी दिला इशारा

Brush केल्या-केल्या चहा पिताय? मग जरा थांबाच! अजिबात करू नका ‘ही’ चूक होईल, मोठे नुकसान
3

Brush केल्या-केल्या चहा पिताय? मग जरा थांबाच! अजिबात करू नका ‘ही’ चूक होईल, मोठे नुकसान

Bladder Stone Removal: सतत टपकतेय लघवी, धार मात्र कमकुवत; म्हणजेच ब्लॅडरमध्ये अडकलाय कचरा, ‘असा’ करा स्वच्छ
4

Bladder Stone Removal: सतत टपकतेय लघवी, धार मात्र कमकुवत; म्हणजेच ब्लॅडरमध्ये अडकलाय कचरा, ‘असा’ करा स्वच्छ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ICC Women Cricket World Cup 2025 : क्रिकेटचे मैदानावर राजकीय नाट्य? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच तापला ‘हा’ मुद्दा 

ICC Women Cricket World Cup 2025 : क्रिकेटचे मैदानावर राजकीय नाट्य? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच तापला ‘हा’ मुद्दा 

IND vs WI : केएल राहुलची कसोटी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी! अर्धशतकासह ‘या’ भारतीय दिग्गजांच्या खास यादीत सामील

IND vs WI : केएल राहुलची कसोटी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी! अर्धशतकासह ‘या’ भारतीय दिग्गजांच्या खास यादीत सामील

Rain Update: पाऊस थांबेना! महाराष्ट्रासह १३ राज्यात पावसाचे अलर्ट, अनेक राज्यात कडाडणार वीज

Rain Update: पाऊस थांबेना! महाराष्ट्रासह १३ राज्यात पावसाचे अलर्ट, अनेक राज्यात कडाडणार वीज

Papankusha Ekadashi 2025: पापंकुश एकादशीला काय आहे शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या 

Papankusha Ekadashi 2025: पापंकुश एकादशीला काय आहे शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या 

Diwali 2025 मध्ये कार खरेदी करण्याचा प्लॅन? मग ‘या’ स्मार्ट टिप्स वापरा आणि हजारोंची बचत करा

Diwali 2025 मध्ये कार खरेदी करण्याचा प्लॅन? मग ‘या’ स्मार्ट टिप्स वापरा आणि हजारोंची बचत करा

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.