• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • World Consumer Rights Day Key Facts On Indian Consumer Rights And Awareness Nrhp 2

World Consumer Rights Day : भारतीय ग्राहकांसाठी आहेत ‘हे’ खास अधिकार; माहित नसेल तर जाणून घ्या

दरवर्षी 15 मार्च रोजी जगभरात 'जागतिक ग्राहक हक्क दिन' साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि ग्राहक संरक्षण कायद्यांविषयी जागरूकता निर्माण करणे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 15, 2025 | 10:11 AM
World Consumer Rights Day Key facts on Indian consumer rights and awareness

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त जाणून घ्या भारतीय ग्राहकांचे हक्क आणि त्यांच्या जाणीवेशी संबंधित महत्त्वाची माहिती ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

World Consumer Rights Day : दरवर्षी १५ मार्च रोजी जगभरात ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि ग्राहक संरक्षण कायद्यांविषयी जागरूकता निर्माण करणे. भारतातही ग्राहकांसाठी अनेक अधिकार आहेत, मात्र बऱ्याच वेळा ग्राहकांना त्यांची जाणीव नसते. त्यामुळे ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.

 जागतिक ग्राहक दिनाची सुरुवात आणि महत्त्व

जागतिक ग्राहक हक्क दिनाची संकल्पना सर्वप्रथम अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी मांडली. १५ मार्च १९६२ रोजी अमेरिकन काँग्रेसला संबोधित करताना त्यांनी ग्राहक हक्कांचा मुद्दा जोरदारपणे मांडला. त्यानंतर १५ मार्च १९८३ पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून, दरवर्षी १५ मार्चला हा दिवस साजरा केला जातो. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना न्याय मिळावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे.

भारतात ग्राहकांना मिळणारे महत्त्वाचे हक्क

भारतीय ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहकांना अनेक अधिकार देण्यात आले आहेत. त्यातील प्रमुख अधिकार खालीलप्रमाणे आहेत:

१. माहितीचा अधिकार

प्रत्येक ग्राहकाला कोणत्याही उत्पादनाची किंवा सेवेची शुद्धता, किंमत आणि गुणवत्ता याबाबत माहिती विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणताही दुकानदार किंवा सेवा प्रदाता ग्राहकाला या माहितीपासून वंचित ठेवू शकत नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘त्यांना सिजफायर नको आहे, पण ते ट्रम्पला घाबरतात…’, पुतीनबद्दल झेलेन्स्कीने केला मोठा दावा

२. निवडीचा अधिकार

ग्राहकाने आपल्या इच्छेनुसार कोणतीही वस्तू किंवा सेवा निवडण्याचा अधिकार आहे. दुकानदार कोणत्याही ग्राहकाला एखादे विशिष्ट उत्पादन घेण्यास भाग पाडू शकत नाही. ग्राहकाला विविध पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत.

३. सुरक्षिततेचा अधिकार

ग्राहकांना सुरक्षित उत्पादने आणि सेवा मिळाव्यात, हा या अधिकाराचा मुख्य उद्देश आहे. जर एखाद्या वस्तूचा दर्जा निकृष्ट असेल आणि त्यामुळे ग्राहकाचे नुकसान होण्याची शक्यता असेल, तर ग्राहक त्या वस्तूविषयी तक्रार दाखल करू शकतो. अशा परिस्थितीत, विक्रेत्याने सदर वस्तू बदलून देणे किंवा त्यासाठी योग्य उपाय करणे आवश्यक आहे.

४. ग्राहक शिक्षणाचा अधिकार

ग्राहकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करण्यासाठी सरकारने वेळोवेळी उपयुक्त मोहिमा राबवाव्यात. ‘जागो ग्राहक जागो’ ही मोहिम याच उद्देशाने चालवली जाते. ग्राहकांना त्यांच्या हक्कांविषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचा अन्याय होणार नाही.

५. ऐकण्याचा अधिकार

जर कोणत्याही ग्राहकासोबत अन्याय झाला असेल किंवा दुकानदाराने गैरवर्तन केले असेल, तर ग्राहकाला त्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ग्राहक न्यायालयामध्ये आपली बाजू मांडण्याचा आणि न्याय मिळविण्याचा हक्क ग्राहक संरक्षण कायद्यान्वये दिला आहे.

६. निवारण मिळविण्याचा अधिकार

ग्राहकाने केलेल्या तक्रारीवर वेळेवर योग्य तो निर्णय घेतला जावा आणि ग्राहकाच्या समस्येचे निराकरण व्हावे, हा या अधिकाराचा मुख्य हेतू आहे. ग्राहकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास, ग्राहक निवारण मंचात जाऊन न्याय मिळवू शकतो.

ग्राहकांनी आपल्या हक्कांची जाणीव ठेवणे आवश्यक

भारतात ग्राहक संरक्षण कायदा २०१९ लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत ग्राहकांना अधिक संरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तथापि, ग्राहकांनी आपल्या हक्कांची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना कुठलाही अन्याय सहन करावा लागणार नाही. ग्राहकांनी वस्तूंची योग्य माहिती घेऊन खरेदी करावी आणि काही समस्या उद्भवल्यास ग्राहक न्यायालयात तक्रार नोंदवावी.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रशिया-युक्रेन युद्धविरामावर सौदीची मध्यस्थी; पुतिन आणि क्राऊन प्रिन्समध्ये चर्चा

ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव

जागतिक ग्राहक हक्क दिन हा ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याचा एक महत्त्वाचा दिवस आहे. ग्राहकांनी आपल्या अधिकारांची माहिती ठेवावी आणि त्याचा योग्य तो उपयोग करावा. यामुळे ग्राहकांचे हित सुरक्षित राहील आणि बाजारातील प्रामाणिकता आणि गुणवत्ता टिकून राहील. ग्राहक जागरूक असतील, तरच त्यांचा सन्मान आणि संरक्षण शक्य होईल.

Web Title: World consumer rights day key facts on indian consumer rights and awareness nrhp 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2025 | 09:19 AM

Topics:  

  • day history
  • lifestlye
  • lifestyle news

संबंधित बातम्या

वैद्यकीय विश्वालाही आव्हान! छत्तीसगढमधील 14 वर्षांच्या मुलीचं शरीर बनत चाललंय दगड, या दुर्मिळ रोगाचं नक्की नाव काय?
1

वैद्यकीय विश्वालाही आव्हान! छत्तीसगढमधील 14 वर्षांच्या मुलीचं शरीर बनत चाललंय दगड, या दुर्मिळ रोगाचं नक्की नाव काय?

अस्सल ORS कसे ओळखावे, ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी FSSAI चा मोठा निर्णय; वेळीच जाणून घ्या
2

अस्सल ORS कसे ओळखावे, ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी FSSAI चा मोठा निर्णय; वेळीच जाणून घ्या

‘असहाय्यतेचे ठिकाण’ ते सन्मानाचं सुरक्षित घर… वृद्धांसाठी आदरणीय ठरतायेत वृद्धाश्रम
3

‘असहाय्यतेचे ठिकाण’ ते सन्मानाचं सुरक्षित घर… वृद्धांसाठी आदरणीय ठरतायेत वृद्धाश्रम

पोषकतत्वांचा पावरहाऊस आहे ABCG Juice; शरीराला आतून करतो डिटॉक्स, घरी कसा बनवायचा ते जाणून घ्या
4

पोषकतत्वांचा पावरहाऊस आहे ABCG Juice; शरीराला आतून करतो डिटॉक्स, घरी कसा बनवायचा ते जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लातूरमध्ये अखंड २,४०० दिवसांचे हरित स्वप्न साकार, अखंडपणे ६ वर्ष ७ महिने काम

लातूरमध्ये अखंड २,४०० दिवसांचे हरित स्वप्न साकार, अखंडपणे ६ वर्ष ७ महिने काम

Dec 23, 2025 | 10:52 PM
संत गाडगेबाबांचे कार्य प्रेरणादायी, आर. एस. राव यांचे प्रतिपादन; गाडगेबाबा पुण्यतिथी कार्यक्रम

संत गाडगेबाबांचे कार्य प्रेरणादायी, आर. एस. राव यांचे प्रतिपादन; गाडगेबाबा पुण्यतिथी कार्यक्रम

Dec 23, 2025 | 10:37 PM
IND W vs SL W 2nd T20: भारतीय महिलांचा लंकेवर पुन्हा विजय! दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ विकेट्सने धुव्वा; मालिकेत २-० ने आघाडी

IND W vs SL W 2nd T20: भारतीय महिलांचा लंकेवर पुन्हा विजय! दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ विकेट्सने धुव्वा; मालिकेत २-० ने आघाडी

Dec 23, 2025 | 10:01 PM
Local Body Elections: मनपा निवडणुकीआधी सांगली पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये;  १५०० गुन्हेगारांना थेट…

Local Body Elections: मनपा निवडणुकीआधी सांगली पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये; १५०० गुन्हेगारांना थेट…

Dec 23, 2025 | 09:35 PM
हेल्मेट घालणं आता ओझं वाटणार नाही! ‘या’ ५ सोप्या पद्धतींनी मिळेल पूर्ण आराम आणि १००% सुरक्षा

हेल्मेट घालणं आता ओझं वाटणार नाही! ‘या’ ५ सोप्या पद्धतींनी मिळेल पूर्ण आराम आणि १००% सुरक्षा

Dec 23, 2025 | 09:24 PM
रणधुमाळी स्थानिक स्वराज्य निवडणुका : सत्ताधाऱ्यांना जोरदार धक्का, विरोधकांचा बुलढाण्यात डंका

रणधुमाळी स्थानिक स्वराज्य निवडणुका : सत्ताधाऱ्यांना जोरदार धक्का, विरोधकांचा बुलढाण्यात डंका

Dec 23, 2025 | 08:54 PM
Share Market Closing: दोन्ही सत्रात बाजार मंदावला, सेन्सेक्स 42 अंकांनी खाली घसरले तर निफ्टी किंचित स्थिर 

Share Market Closing: दोन्ही सत्रात बाजार मंदावला, सेन्सेक्स 42 अंकांनी खाली घसरले तर निफ्टी किंचित स्थिर 

Dec 23, 2025 | 08:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Dec 23, 2025 | 07:20 PM
Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Dec 23, 2025 | 07:09 PM
“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

Dec 23, 2025 | 07:02 PM
Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Dec 23, 2025 | 06:55 PM
Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Dec 23, 2025 | 06:40 PM
Virar : तडीपार आरोपीला ‘बी परवाना’ दिल्याचा आरोप ,वसई विरार महापालिकेसमोर उपोषण

Virar : तडीपार आरोपीला ‘बी परवाना’ दिल्याचा आरोप ,वसई विरार महापालिकेसमोर उपोषण

Dec 23, 2025 | 06:33 PM
Uran : उरण नगरपरिषद निवडणूकीमध्ये २१ वर्षाची लहान नगरसेविका

Uran : उरण नगरपरिषद निवडणूकीमध्ये २१ वर्षाची लहान नगरसेविका

Dec 23, 2025 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.