अक्षर पटेल आणि शुभमन गिल(फोटो-सोशल मिडिया)
GT vs DC : आयपीएल २०२५ चा ३५ वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना आज १९ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. सामन्यापूर्वी गुजरातने टॉस जिंकून जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मागील सामना जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स गुजरातसोबत भिडणार आहे. तर गुजरातला गेल्या सामन्यात मात्र पराभवाचा सामना करावा लागला होता. दोन्ही संघ गुणतालीकेत अव्वल स्थान पटकावण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.
दिल्ली कॅपिटल्सने राजस्थानविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये शेवटचा सामना जिंकला होता. दिल्ली कॅपिटल्स ६ सामन्यांत ५ विजयांसह अव्वल स्थानावर आहे. तर गुजरात संघ ६ सामन्यांत ४ विजयांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. जर गुजरात संघाने आजचा सामना जिंकला तर तो पहिल्या स्थानावर झेप घेईल. जर दिल्लीने हा सामना जिंकला तर ते प्लेऑफच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकणार आहे.
हेही वाचा : RR vs LSG : राजस्थान रॉयल्स संघाचा कणा मोडला! लखनौविरुद्ध मैदानात उतरणार नाही ‘हा’ खेळाडू..
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल सांगायचे झाल्यास , येथे फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टी आहे. प्रथम फलंदाजी करून २०० धावा करणाऱ्या संघाला फायदा होणार आहे.
हवामानाबद्दल सांगायचे झाले तर, खेळाडूंची अवस्था वाईट असणार आहे. हा दिवसाचा सामना असल्याने भरपूर सूर्यप्रकाश आणि उष्णता जाणवणार आहे. येथे तापमान ४० अंशांपेक्षा जास्त राहील. अशा परिस्थितीत खेळाडूंना उष्णतेचा त्रास जणवण्याची शक्यता आहे. दवाचा कोणताही परिणाम नसल्याने, गोलंदाजांना दोन्ही डावात यश मिळण्याची पूर्ण शक्यता असेल.
आयपीएलमध्ये आतापर्यंत गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये ५ सामने झाले आहेत. ज्यामध्ये दिल्लीने ३ सामने जिंकले आहेत. तर गुजरातने २ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांनी या हंगामात शानदार कामगिरी केली आहे.
गुजरात टायटन्स : साई सुदर्शन, शुभमन गिल (क), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज.
दिल्ली कॅपिटल्स: जेक फ्रेझर-मॅकगर्क/फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा.