फोटो सौजन्य : BCCI
सचिन तेंडुलकरची पोस्ट : भारतीय संघासाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे, टीम इंडीयाने पहिल्या दिनी 359 धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडे अजुनही 7 विकेट्स हातामध्ये शिल्लक आहेत. भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि रिषभ पंत हे दोघे सध्या फलंदाजी करत आहेत. भारताचा संघ आज फलंदाजी करुन किती धावसंख्या उभारेल याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. भारताच्या दोन खेळाडूंनी शतक पुर्ण केले आहे. शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी संघासाठी शतक झळकावले. त्याचबरोबर केएल राहुल आणि रिषभ पंत या दोघांनी देखील संघासाठी चांगली कामगिरी केली आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या अखेरीस , ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने विचारले की या डावात तिसरा शतक करणारा कोण असेल? खरंतर, लीड्समध्ये सुरू असलेला हा सामना पाहून सचिन तेंडुलकरला २००२ च्या हेडिंग्ले कसोटीची आठवण झाली जेव्हा त्याच्यासोबत आणखी दोन भारतीय खेळाडूंनी शतके झळकावली होती. हा तोच सामना आहे जेव्हा भारताने लीड्सच्या मैदानावर शेवटच्या वेळी ब्रिटिशांना पराभूत केले होते.
शेवटी वेबरला नीरज चोप्राने टाकलं मागे! गोल्डन बॉय Paris Diamond League चा चॅम्पियन
त्या सामन्यात सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी शतके झळकावली होती. या सामन्यात आतापर्यंत यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी शतके झळकावली आहेत आणि ऋषभ पंत ६५ धावा करून फलंदाजी करत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर सचिन तेंडुलकरने ट्विटरवर लिहिले की, “केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी रचलेल्या भक्कम पायामुळे भारताचा दिवस चांगला गेला. यशस्वी आणि शुभमन गिल यांचे त्यांच्या शानदार शतकांसाठी अभिनंदन.
A solid foundation laid by @klrahul and @ybj_19 enabled India to have a good day. Congratulations to Yashasvi and @ShubmanGill for their brilliant centuries. @RishabhPant17’s contribution was equally important for the team.
India’s batting today reminded me of the Headingley…
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 20, 2025
ऋषभ पंतचे योगदान संघासाठी तितकेच महत्त्वाचे होते. आज भारताच्या फलंदाजीने मला २००२ मध्ये झालेल्या हेडिंग्ले कसोटीची आठवण करून दिली, जेव्हा राहुल, सौरव गांगुली आणि मी पहिल्या डावात शतके झळकावली होती आणि आम्ही कसोटी जिंकली होती. आज यशस्वी आणि शुभमनने त्यांचे काम केले आहे. यावेळी तिसरे शतक कोण झळकावेल?”