सामन्यादरम्यान फलंदाजाचा फटका इतका जोरात असतो की चेंडू स्टेडियमबाहेर जातो किंवा अशा ठिकाणी अडकतो जिथून तो परत आणणे शक्य नसते. अशा परिस्थितीत चेंडू बदलण्याबाबत बीसीसीआयने स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
ईडनच्या मैदानात रहाणेच ‘अजिंक्य’! 20 चेंडूत दिसला ‘रुद्रावतार’; ठोकले वादळी अर्धशतक, पहा Video
यावेळच्या आयपीएलमध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे ‘दुसऱ्या डावातील चेंडू बदलाच्या’ नियमाची. हा नियम सामन्यात नवीन थरार निर्माण करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या हंगामातही दव (Dew) असल्यामुळे चेंडू ओला झाल्यास तो बदलण्याची तरतूद होती. पण यंदा बीसीसीआयने यात एक ‘पेच’ टाकला आहे जो गोलंदाजांसाठी फायद्याचा ठरू शकतो. यंदाच्या नियमानुसार, जर गोलंदाजी करणाऱ्या संघाने 10 षटकांनंतर चेंडू बदलण्याची मागणी केली, तर मैदानावर दव असो वा नसो, चेंडू अनिवार्यपणे बदलावाच लागेल. रात्रीच्या सामन्यात दव पडल्यामुळे चेंडू ओला आणि मऊ होतो, ज्यामुळे गोलंदाजांची पकड सुटते आणि फलंदाजी सोपी होते. हा अन्याय टाळण्यासाठी बीसीसीआयने 10 षटकांनंतर सुका आणि समान झीज झालेला चेंडू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
हा नियम लागू झाल्यामुळे फिरकीपटू (Spinners) आणि डेथ ओव्हरमधील वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळण्याची शक्यता आहे. कारण 10 षटकांनंतर नवीन किंवा सुका चेंडू मिळाल्यास त्यांना अधिक चांगली ग्रीप मिळेल आणि रिव्हर्स स्विंग किंवा टर्न मिळवणे सोपे जाईल.






