फोटो सौजन्य - Proteas Men
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना : दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना पार पडला या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सात विकेट्सने विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाला दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 131 धावांवर गुंडाळले. इंग्लंडच्या संघाने 25 ओवर देखील पूर्ण खेळू शकले नाही.
इंग्लंडच्या संघामधील यूवा खेळाडू जेमी स्मिथ याने 54 धावांची सर्वाधिक खेळी खेळली त्या व्यतिरिक्त एकही फलंदाज 15 धावांचा आकडा पार करू शकला नाही. जॉस बटलर, जो रूट, बेन डकेट, जोफ्रा आर्चर सारखे दिग्गज खेळाडू असूनही दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर फेल ठरले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 131 धावांचे लक्ष सहज पार केले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 3 विकेट्स गमावून 137 धावा केल्या, हे लक्ष 20.5 ओव्हरमध्ये पुर्ण केले.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये आज म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी दुसरा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना इंग्लडच्या लाॅर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना 5.30 मिनिटांनी सुरु होणार आहे. या सामन्याच्या अर्ध्या तासाआधी नाणेफेक होईल. 2027 च्या विश्वचषकाआधी दोन्ही संघासाठी ही मालिका फार महत्वाची आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला मालिकेमध्ये पराभूत करुन आता त्यांची नजर या मालिकेवर असणार आहे.
या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहायला मिळणार आहे. तर टेलिव्हिजनवर पाहणाऱ्या प्रेक्षकांना या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा उपकर्णधार एडेन मार्करामने इंग्लंडविरुद्ध लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार फलंदाजी केली. त्याने फक्त २३ चेंडूत अर्धशतक झळकावले आणि संघाला ७ विकेट्सने मोठा विजय मिळवून दिला. यासह, दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
IPL चे रहस्य Lalit Modi ने केले उघड, म्हणाला – त्या दिवशी मी पुस्तकातील प्रत्येक नियम मोडला…!
मार्करामने दक्षिण आफ्रिकेसाठी इंग्लंडविरुद्ध (२०१६ नंतर) रायन रिकेलटनसोबत पहिली १००+ धावांची सलामी भागीदारी देखील नोंदवली. मार्करामने ५५ चेंडूत ८६ धावा केल्या आणि आदिल रशीदने त्याला बाद केले. रिकेल्टन (नाबाद ३१) आणि डेवाल्ड ब्रेव्हिस (नाबाद ६) यांनी संघाला आरामात लक्ष्य गाठून दिले. दक्षिण आफ्रिकेने १८७ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला.