फोटो सौजन्य : X
मार्कस स्टोइनिस : यंदा अनेक जगभरातील क्रिकेट खेळाडूंनी निवृती घेतली आहे. पण काही असेही खेळाडू आहेत ज्यांनी आंंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृती घेतली आहे पण अजुनही फ्रॅन्चायझी क्रिकेट खेळत आहेत. आयपीएल त्याचबरोबर मेजर क्रिकेट लीगसारख्या प्रसिद्ध स्पर्धा खेळाडू खेळतात. यामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात कमाई होते. सध्या अमेरिकेत मेजर लीग क्रिकेटची धूम सुरू आहे. या लीगमध्ये अनेक देशांचे खेळाडू धमाल करत आहेत.
त्याच वेळी, टेक्सास सुपर किंग्ज आणि सिएटल ऑर्कास यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूची स्फोटक कामगिरी पाहायला मिळाली. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, या खेळाडूने मेजर लीग क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे आणि त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच विरोधी गोलंदाजांना चकवा दिला आहे. होय, आम्ही मार्कस स्टोइनिसबद्दल बोलत आहोत. जो मेजर लीग क्रिकेटमध्ये त्याचा पहिला सिझनमध्ये खेळत आहे.
नाद करा पण दक्षिण आफ्रिकेचा कुठं… चॅम्पियन झाल्यानंतर कर्णधाराच्या नावावर तयार केलं गाण, Video Viral
मार्कस स्टोइनिस हा मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या हंगामात टेक्सास सुपर किंग्जचा भाग आहे. या सामन्यात स्टोइनिसने शानदार फलंदाजी केली आणि फक्त १२ चेंडूत २८ धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान स्टोइनिसने ४ शानदार षटकार मारले. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २३३.३३ होता. याशिवाय, गोलंदाजी करताना मार्कसने २ षटकांत फक्त ४ धावा देऊन १ बळी घेतला.
Yellow blood
Perfect tailer made player for CSK or super kings teams
Arrived today !
Marcus Stoinis
Super king now pic.twitter.com/6GiYlktQtp— MisterTerrific (@imisterterrific) June 17, 2025
स्टोइनिसने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आधी फेब्रुवारीमध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर, स्टोइनिसची चमकदार कामगिरी आयपीएलमध्येही दिसून आली. आयपीएल २०२५ मध्ये, स्टोइनिसने फलंदाजी करताना १६० धावा केल्या, त्याशिवाय त्याने गोलंदाजीत ४ विकेट्स घेतल्या.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टेक्सास सुपर किंग्जने २० षटकांत ६ गडी गमावून १५३ धावा केल्या. यामध्ये सैतेजाच्या ३० धावा, स्टोइनिसच्या २८ आणि डॅरिल मिशेलच्या २५ धावांचा समावेश होता. सिएटल ऑर्कासकडून गोलंदाजी करताना जसदीप सिंग आणि हरमीत सिंग यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. मेजर क्रिकेट लीगचे अनेक सामने मनोगरंजक झाले आहेत. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यामध्ये वर्ल्ड रेकाॅर्ड नावावर केला.