फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल मागील काही वर्षांपासून सोशल मीडियावर त्याच्या वैयत्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहेत. असे म्हंटले जात आहे की, चहल आणि धनश्री लवकरच घटस्फोट घेणार आहे. आता यासंदर्भात आणखी एक अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून असा दावा केला जात होता की घटस्फोटानंतर चहलला धनश्रीला पोटगी म्हणून ६० कोटी रुपये द्यावे लागू शकतात. तथापि, या अफवांमध्ये किती तथ्य आहे. चहलने स्वतः त्याच्या पोस्टद्वारे या प्रश्नांची उत्तरे दिली.
युजवेंद्र चहलने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले – “मी माझ्या सर्व चाहत्यांचा मनापासून आभारी आहे, ज्यांच्या अढळ प्रेम आणि पाठिंब्याशिवाय मी येथे पोहोचू शकलो नसतो. पण माझा प्रवास अजून संपलेला नाही. माझ्या देशासाठी, माझ्या संघासाठी आणि माझ्या चाहत्यांसाठी टाकण्यासाठी अजूनही अनेक उत्तम षटके बाकी आहेत!”
तो पुढे म्हणाला – “खेळाडू असण्यासोबतच मी एक मुलगा, भाऊ आणि मित्र देखील आहे. मी समजू शकतो की लोकांना अलीकडील घडामोडींबद्दल, विशेषतः माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उत्सुकता आहे. तथापि, मी सोशल मीडियावर काही पोस्ट पाहिल्या आहेत, ज्या खऱ्या असू शकतात किंवा नसू शकतात. एक मुलगा, भाऊ आणि मित्र म्हणून, मी सर्वांना विनंती करतो की अशा प्रकारच्या अटकळींमध्ये अडकू नका कारण त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला खूप वेदना होत आहेत. माझ्या कौटुंबिक मूल्यांनी मला नेहमीच सर्वांचे कल्याण करावे आणि शॉर्टकट न घेता कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने यश मिळवावे हे शिकवले आहे. मी या मूल्यांचे पालन करत राहीन.” “देवाच्या कृपेने, मला नेहमीच तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची अपेक्षा आहे, सहानुभूतीची नाही.”
युवराज सिंह आणि इरफान पठाणने उडवली हेड कोच गौतम गंभीरची खिल्ली! सोशल मीडियावर Photo Viral
चहल आणि धनश्रीचे नाते
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचे डिसेंबर २०२० मध्ये लग्न झाले. धनश्री ही व्यवसायाने एक नृत्यांगना आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत, परंतु गेल्या काही काळापासून त्यांच्या कमी संवादामुळे आणि सोशल मीडियावरील त्यांच्या क्रियाकलापांमध्ये बदल झाल्यामुळे चाहत्यांमध्ये घटस्फोटाच्या अफवा पसरल्या आहेत. या दोघांनी अजुनपर्यत कोणत्याही प्रकारची घटस्फोटाची बातमी अधिकृतपणे दिलेली नाही.
युजवेंद्र चहलच्या पोस्टवरून हे स्पष्ट होते की घटस्फोट आणि ६० कोटी रुपयांच्या पोटगीच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, खोट्या अफवांवर लक्ष देऊ नये आणि वैयक्तिक आयुष्यात अनावश्यक हस्तक्षेप करू नये. आता धनश्री वर्मा या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देते हे पाहणे बाकी आहे.
T२० विश्वचषकमध्ये चहल संघामध्ये स्थान मिळाले होते. पण विश्वचषकाचा एकही सामना त्याला खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर त्याला टीम इंडियामधून सातत्याने वगळले जात आहे.