फोटो सौजन्य - सोशल मीडिया
युजवेंद्र चहल घटस्फोट : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये आज चॅम्पियन ट्रॉफीचा सामना रंगणार आहे. यासाठी संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचे सध्या सामन्यावर लक्ष्य आहे. याचदरम्यान सध्या मागील काही महिन्यांपासून भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सध्या त्यांच्या वैयत्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. भारत संघाचा स्टार क्रिकेटपटू युझवेंद्र चहल बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेर आहे. तो सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल म्हणजेच घटस्फोटाच्या बातम्यांमुळे सातत्याने चर्चेत राहिला आहे.
WPL 2025 च्या गुणतालिकेमध्ये डिफेन्डिंग चॅम्पियनचा दबदबा! जाणून घ्या कशी आहे पॉईंट टेबलची स्थिती
मागील काही महिन्यांपासून युजवेंद्र चहल आणि त्याच्या पत्नी धनश्री वर्मा या दोघांमध्ये सर्व काही ठीक नसल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर या दोघांनी सोशल मीडियावर देखील एकमेकांना अनफॉलो केले आहे त्याचबरोबर दोघांनीही लग्नाचे फोटो देखील काढून टाकले आहेत. आता या सगळ्यामध्ये, चहलने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, जिथे त्याने देवाचे आभार मानले आहेत. त्यांची पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘मी मोजू शकत नाही त्यापेक्षा जास्त, देवाने नेहमीच माझे रक्षण केले आहे. म्हणून मी फक्त अशा वेळा कल्पना करू शकतो जेव्हा माझे तारण झाले आणि मला त्याबद्दल माहितीही नाही. देवाचे आभार, तू नेहमीच तिथे असशील, तेव्हाही मला ते माहित नव्हते.
Yuzi Chahal’s Instagram story. pic.twitter.com/mlEGpPOLLO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 20, 2025
घटस्फोटाबाबत अद्याप या जोडप्याकडून कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही, हे आम्ही तुम्हाला सांगतो. दोघांनीही इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यावर या अफवांना आणखी बळकटी मिळाली. सोशल मीडियावर सुरू असलेल्या अलिकडच्या अटकळींनुसार, चहलच्या चाहत्यांनी असा दावा केला आहे की घटस्फोट झाल्यास त्याला धनश्री वर्माला ६० कोटी रुपये पोटगी द्यावी लागेल.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर अनेक वृत्तांमध्ये सांगण्यात आले आहे की, युजवेंद्र चहलला घटस्फोट झाल्यानंतर त्याची पत्नी धनश्री वर्माला ६० कोटी रुपये द्यावे लागणार आहे, परंतु या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे यावर अजुनपर्यत काहीही स्पष्ट झाले नाही. सोशल मीडियावर खेळाडू पोस्ट शेअर करत आहेत त्यामुळे तो सातत्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
शेवटचा युजवेंद्र चहलला भारतीय संघामध्ये २०२४ च्या T२० विश्वचषकामध्ये १५ खेळाडूंच्या संघामध्ये स्थान मिळाले होते पण त्याला त्यावेळी एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर त्याला टीम इंडियामधून सातत्याने वगळण्यात आले आहे.