फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया
महिला प्रीमियर लीग २०२५ गुणतालिका : महिला प्रीमियर लीग २०२५ ला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचे आतापर्यत ६ सामने झाले आहेत. या स्पर्धेत ५ संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. तर कालच्या सामन्यांमध्ये मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने बुधवारी महिला प्रीमियर लीगच्या सहाव्या सामन्यात युपी वॉरियर्सचा ७ गडी राखूनपराभव केलायासह, डीसी संघ पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर परतला. त्यामुळे आता महिला प्रीमियर लीग २०२५ ची गुणतालिका फारच मनोरंजक झाली आहे, आज आम्ही तुम्हाला महिला प्रीमियर लीग २०२५ चे गणित सामावून सांगणार आहोत.
आरसीबीविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे डब्ल्यूपीएल पॉइंट टेबलमधील त्यांच्या नेट रन रेटवर परिणाम झाला, परंतु त्यांनी यूपीला हरवून त्यात निश्चितच सुधारणा केली आहे. हंगामातील दुसऱ्या विजयानंतर, डीसी संघ ४ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ अव्वल स्थानावर आहे. आरसीबी आणि डीसीचे ४-४ गुण समान आहेत, परंतु चांगल्या नेट रन रेटमुळे, बंगळुरू अव्वल स्थानावर आहे तर दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे.
IND Vs BAN Pitch Report : दुबईच्या खेळपट्टीवर नाणेफेक ठरवेल सामन्याचा निकाल! जाणून घ्या पीच रिपोर्ट
या स्पर्धेत गतविजेता बंगळुरू हा एकमेव संघ आहे ज्याने अद्याप पराभवाची चव चाखलेली नाही. सलग दोन सामने जिंकल्यानंतर संघ अव्वल स्थानावर आहे. आरसीबीचा नेट रन रेट +१.४४० आहे. दुसरीकडे, दिल्ली ३ पैकी २ सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे, त्यांचा नेट रन रेट -०.५४४ आहे. तिसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा संघ आहे, मुंबईचे आतापर्यत २ सामने झाले आहेत, यामध्ये त्यांनी १ सामन्यात विजय मिळवला आहे तर १ सामन्यात पराभवाचा सामना करावा लगला आहे.
चौथ्या स्थानावर गुजरात जायंट्सचा संघ आहे. गुजरात जायंट्सच्या संघाचे ३ सामने झाले आहेत, यामध्ये त्यांनी १ सामन्यात विजय मिळवला आहे तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शेवटच्या आणि पाचव्या स्थानावर युपी वॉरियर्सचा संघ आहे. युपीचे आतापर्यत २ सामने झाले आहेत. यामध्ये त्यांना दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Vadodara ✅
🆙 ⏭️ Bengaluru#RCB remain at 🔝 as the first leg in #TATAWPL 2025 comes to an end 🙌 pic.twitter.com/iDN25m42iu— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 19, 2025
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, किरण नवगिरेच्या अर्धशतकाच्या जोरावर यूपी वॉरियर्सने २० षटकांत ७ गडी गमावून १६६ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना, दिल्ली कॅपिटल्सने शानदार सुरुवात केली. सलामीवीर शफाली वर्मा (२६) आणि मेग लॅनिंग (६९) यांनी ६.५ षटकांत पहिल्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर अॅनाबेल सदरलँडने ४१ धावा करत संघाला १ चेंडू आणि ७ विकेट शिल्लक असताना विजय मिळवून दिला. अॅनाबेल सदरलँडला तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने बॅटच्या आधी चेंडूने कहर करत २ विकेट्स घेतल्या.