फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
चॅम्पियन ट्रॉफी सेमीफायनल सामने : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना २ मार्च रोजी सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाला किवी संघाला ४४ धावांनी पराभूत करून दणदणीत विजय मिळवला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक निश्चित झाले आहे. रविवारी २ मार्च रोजी भारताने न्यूझीलंडविरुद्ध ४४ धावांनी शानदार विजय मिळवला. हा स्पर्धेतील शेवटचा लीग सामना होता. भारत गट-अ मध्ये अव्वल स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. भारताने गट फेरीत तिन्ही सामने जिंकले आणि सहा गुण मिळवले.
India vs New Zealand : सामन्यादरम्यान विराट कोहलीने धरलेअक्षर पटेलचे पाय, सोशल मीडियावर Video Viral
न्यूझीलंडपूर्वी भारताने पाकिस्तान आणि बांगलादेशला ६-६ गडी राखून पराभूत केले होते. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने ग्रुप बी मध्ये दुसरे स्थान पटकावले. त्याने तीनपैकी एक सामना जिंकला तर दोन सामने पावसामुळे रद्द झाले होते. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पाच विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाचे एकूण चार गुण झाले. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्य सामना मंगळवारी (२ मार्च) दुबईच्या मैदानावर होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तान करत आहे पण भारत त्यांचे सर्व सामने हायब्रिड मॉडेलनुसार दुबईमध्ये खेळत आहे.
स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवार, ५ मार्च रोजी खेळला जाईल. दक्षिण आफ्रिका ग्रुप बी मध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याने ५ गुण मिळवले. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा १०७ धावांनी पराभव केला आणि इंग्लंडचा सात विकेट्सनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना पावसामुळे वाया गेला. न्यूझीलंडने लीग स्टेजमध्ये चार गुणांसह शेवट केला. पाकिस्तानला ६० धावांनी पराभूत करण्यासोबतच किवी संघाने बांगलादेशलाही पाच विकेट्सने पराभूत केले. अंतिम सामना ९ मार्च रोजी होईल. जर भारताने उपांत्य फेरी जिंकली तर अंतिम सामनाही दुबईमध्येच होईल.
४ मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहिला उपांत्य सामना, दुबई
५ मार्च : दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड, दुसरा उपांत्य सामना, लाहोर
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, रोहित ब्रिगेडने २४९/९ च्या धावसंख्येचा बचाव केला. श्रेयस अय्यरने ९८ चेंडूत ७९ धावा ठोकण्यापूर्वी भारताने शुभमन गिल (२), रोहित (१५) आणि विराट कोहली (११) यांचे बळी ३० धावांत गमावले. हार्दिक पंड्याने ४५ धावा आणि अक्षर पटेलने ४२ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडचा संघ ४५.३ षटकांत २०५ धावांवर आटोपला. केन विल्यमसन (१२० चेंडूत ८१ धावा) वगळता कोणताही किवी खेळाडू भारतीय गोलंदाजांचा सामना करू शकला नाही. भारताकडून फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने ४२ धावांत पाच विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने दोन, तर रवींद्र जडेजा, हार्दिक आणि अक्षरने प्रत्येकी एक विकेट घेतली. वरुणला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.