भारत आणि पाकिस्तान संघ(फोटो-सोशल मीडिया)
IND VS PAK : आशिया कप २०२५ (Asia cup 2025) स्पर्धा चांगल्याच रंगतदार वळणावर पोहचली आहे. यामध्ये आज २१ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा आमनेसामने येणार आहे. या स्पर्धेत हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा समोरासमोर असणार आहेत. १४ सप्टेंबर रोजी गट टप्प्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता, या सामन्यात सूर्यकुमार यादव आर्मीने पाकिस्तानवर 7 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला होता. या सामन्यात गोलंदाजी, फलंदाजी वा क्षेत्ररक्षण या प्रत्येक आघाडीवर पाकिस्तान अपयशी ठरलेला दिसून आला होता.
पाकिस्तानचा भारताकडून मानहानिकारक पराभव झाला होता. या परभवाचे पडसाद केवळ पॉइंट टेबलवरच दिसून आले असे नाही तर जागतिक पातळीवर देखील दिसून आले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील स्पर्धेवर आता माजी भारतीय कर्णधार आणि निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, प्रसिद्ध अशी भारत-पाकिस्तान यांच्यातील स्पर्धा आता पूर्वीसारखी रोमांचक राहिलेली नाही. श्रीकांत यांच्यामते, आताचा पाकिस्तानी संघ खूप कमकुवत आहे की प्रेक्षकही या सामन्यांमध्ये फारसा रस दाखवताना दिसत नाहीत.
श्रीकांत यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले आहे की, “पुढे जाऊन, पाकिस्तानला मोठ्या संघांविरुद्ध खेळण्याची गरज पडणार नाही. त्यांना असोसिएट राष्ट्रांसोबत ठेवून त्याऐवजी मजबूत संघांना संधी द्यायला हवी. खरं तर, पाकिस्तान अशा प्रतिष्ठित स्पर्धेचा भाग असणे शोभत नाही.”
१९८३ चा विश्वचषक विजेते राहिलेले श्रीकांतन यांनी असे देखील म्हटले की सध्याचा पाकिस्तानी संघ हा कोणत्याही वरिष्ठ आंतरराष्ट्रीय संघासोबत मिळता जुळता वाटत नाही. त्यांनी आपले परखड मत मांडले. ते म्हणाले की, “हा संघ चेन्नई लीगमधील सातव्या विभागीय संघासारखा दिसत आहे. त्यांच्याकडे ना आत्मविश्वास आहे ना कोणतीही भीतीदायक शक्ती आहे.”
श्रीकांत यांची नाराजी केवळ खेळाडूंपुरती मर्यादित नसून त्यांनी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाला की “हेसन वारंवार दावा करतो की त्याचा संघ मजबूत होता आणि भारताविरुद्ध तो दुर्दैवी ठरला. परंतु वास्तविक पाहता त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ कुठेही स्पर्धा करू शकत नाही.”
भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटमधील “सर्वात मोठी लढाई” म्हणून प्रसिद्ध याहे. सर्वांच्या नजरा या सामन्यावर असत होत्या, मात्र श्रीकांत यांना असा विश्वास आहे की सध्याच्या काळात या सामन्याची मजा कमी होत आहे. जेव्हा एखादा संघ सातत्याने खराब कामगिरी करत असतो तेव्हा मात्र सामन्याचा उत्साह कमी होताना दिसतो.
हेही वाचा : Asia Cup 2025 : IND vs PAK सामना मोफत पाहायचा आहे का? एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण माहिती