फोटो सौजन्य - बीसीसीआय
आशिया कप 2025 मध्ये 8 सामने या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत, यामध्ये पहिल्या गटामध्ये यूएई, पाकिस्तान, भारत, ओमान या संघाचा समावेश आहे. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये यूएईचा पराभव केला होता. तर पाकिस्तानचा संघ हा पहिला सामना आज ओमानविरुद्ध खेळणार आहे. पहिल्या गटाच्या गुणतालिकेमध्ये भारताचा संघ अव्वल स्थानावर आहे. यामध्ये शेवटच्या स्थानावर यूएईचा संघ आहे, आजच्या सामन्यानंतर या गुणतालिकेचे गणित बदलणार आहे.
दुसऱ्या गटामध्ये अफगाणिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका आणि हाॅंगकाॅंग हे संघ आहेत. पहिल्या स्थानावर या गटामध्ये अफगाणिस्तानचा संघ आहे. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने हाॅंगकाॅंगच्या संघाला पराभूत करुन पहिला विजय नावावर केला आहे, तर दुसरा सामना हा दुसऱ्या गटाचा हा बांग्लादेश विरुद्ध हाॅंगकाॅंग यांच्यामध्ये झाला आहे. दुसऱ्या सामन्यात हाॅंगकाॅंगचा पराभव झाला आणि हा हाॅंगकाॅंगचा सलग दुसरा पराभव होता. त्यामुळे दुसऱ्या गटामध्ये शेवटच्या स्थानावर हाॅंगकाॅंगचा संघ आहे.
आशिया कप २०२५ मधील तिसरा सामना बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हाँगकाँगला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत हाँगकाँगचा हा सलग दुसरा पराभव होता. या पराभवामुळे हाँगकाँगचा आशिया कपमधील प्रवास आता जवळजवळ निश्चित मानला जात आहे. दुसरीकडे, यूएईचे ग्रुप-ए मधून बाहेर पडणे निश्चित मानले जात आहे. यूएईने आशिया कप २०२५ मध्ये आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे.
हा सामना यूएईने टीम इंडियासोबत खेळला होता, जो सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ९ गडी राखून जिंकला. जर UAE ने आणखी एक सामना गमावला तर त्यांच्यासाठी सुपर-४ चे दरवाजे जवळजवळ बंद होतील. आज आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तान आणि ओमान यांच्यात सामना होणार आहे, दोन्ही संघांमधील हा पहिलाच सामना असणार आहे. पाकिस्तान संघाच्या या सामन्यात विजयाची शक्यता ९९ टक्के असल्याचे मानले जात आहे.
अशा परिस्थितीत, ओमान हा तिसरा संघ असू शकतो जो लवकरच आशिया कप २०२५ मधून वगळला जाऊ शकतो. आतापर्यत तीन सामने झाले आहेत. काही संघाचे सामने अजूनपर्यत झालेले नाहीत त्यामुळे आतापर्यत गुणतालिकेमध्ये अनेक फेरबदल पाहायला मिळणार आहेत.