फोटो सौजन्य - Cricket Australia सोशल मीडिया
महिला T20 विश्वचषक 2024 : महिला T20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेमधील आता काही मोजकेच सामने शिल्लक आहेत. भारताचा संघाचा पुढील सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध असणार आहे. टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाचा मोठे आव्हान असणार आहे. भारताच्या संघाने पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध गमावला होता. त्यामुळे भारताचा संघ सध्या ग्रुप A च्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता भारताच्या संघाने सलग दोन सामने जिंकले आहेत, त्यामुळे भारताच्या संघाला उपांत्य फेरीमध्ये जाण्यासाठी तिसरा सामना जिंकले गरजेचे आहे. काल पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना झाला, यामध्ये पाकिस्तानच्या संघाला ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्सने पराभूत केलं आहे आणि त्यामुळे आता त्यांनी जवळजवळ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश पक्का केला आहे.
ऑस्ट्रेलियाचा निव्वळ रन रेट +2.786 आहे. त्याच वेळी, भारत +0.576 निव्वळ रन रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि न्यूझीलंड -0.050 सह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा शेवटचा सामना भारतासोबत शारजाहमध्ये आहे. न्यूझीलंडचे अजून दोन सामने बाकी आहेत. जर भारताने ऑस्ट्रेलियाचा मोठ्या फरकाने पराभव केला नाही आणि न्यूझीलंडने आपले दोन्ही सामने जिंकले तरच ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल, अन्यथा अंतिम चारमधील ऑस्ट्रेलियाचे स्थान जवळपास पक्के झाले आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी शेवटच्या सामन्यात करिष्मा करावा लागणार आहे. तर भारताच्या संघाला इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल.