मुंबई : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा (Australia cricket team) भारत दौऱ्यापूर्वीच (India tour) मोठा धक्का बसला आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियाचा संघ टेन्शमध्ये आला असून, आता भारताचा विजय पक्का समजला जात आहे. ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध भारतात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. (T20 series) ही मालिका २० सप्टेंबरपासून सुरू होत आहे, पण मालिका सुरु होण्याआधीच ऑस्ट्रेलियाने तीन स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. म्हणजे टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने तीन महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.
[read_also content=”मुंबई पालिकेत होत असलेले फेरबदल प्रशासकीय स्वरूपाचे, बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप नाही – पालिका प्रशासन https://www.navarashtra.com/maharashtra/changes-in-the-mumbai-municipality-decision-only-by-administrative-325735.html”]
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मिचेल स्टार्क, मिचेल मार्श आणि मार्कस स्टॉइनिस (Mitchell Starc, Mitchell Marsh and Marcus Stoinis) यांना भारत दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, या तीन खेळाडूंच्या जागी नॅथन एलिस, डॅनियल सॅम्स आणि शॉन ॲबॉट यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अरोन फिंच याने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, अरोन फिंच टी २० विश्वचषकासाठी कर्णधार असेल. तर डेव्हिड वॉर्नरला भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेतून आधीच विश्रांती देण्यात आली होती. भारताविरुद्धची मालिका खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकाही खेळायची आहे, त्यानंतर त्यांच्याच देशात टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होईल. ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध पहिला टी-२० सामना २० सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे.
असा असणार ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
• २० सप्टेंबर – पहिला सामना – मोहाली
• २३ सप्टेंबर – दुसरा सामना – नागपूर
• २५ सप्टेंबर – तिसरा सामना – हैदराबाद
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ:
अॅरॉन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, शॉन ॲबॉट, ॲश्टन अगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ॲडम झम्पा






