फोटो सौजन्य - सोशल मिडिया
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्यांची अॅशेस मालिका खेळवली जात आहे. या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाचा पुर्णपणे दबदबा पाहायला मिळाला आहे. या मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने एकही सामना गमावला नाही, तीनही सामने एकतर्फी जिंकून मालिका जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने या संपूर्ण मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे.
या कसोटीत स्टीव्ह स्मिथ पुनरागमन करत आहे, तर नियमित कर्णधार पॅट कमिन्स या सामन्यासाठी उपलब्ध नाही. स्टीव्ह स्मिथ पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने आधीच ३-० अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे. स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने जिंकले, तर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली त्यांनी तिसरी कसोटी जिंकली. याशिवाय, संघातील आकर्षणाचे केंद्र झे रिचर्डसन आहे, जो चार वर्षांनी ऑस्ट्रेलियन संघात परतत आहे.
ऑस्ट्रेलियाने त्यांच्या १२ जणांच्या संघात एकाही फिरकी गोलंदाजाचा समावेश केलेला नाही. नॅथन लायनची जागा घेणाऱ्या टॉड मर्फीलाही संघातून वगळण्यात आले आहे. २०२१ पासून दीर्घ स्वरूपाचा सामना न खेळणारा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करत आहे. त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये अपवादात्मक कामगिरी केली आहे.ऑस्ट्रेलिया पूर्णपणे त्यांच्या वेगवान आक्रमणावर लक्ष केंद्रित करत आहे, पहिल्या दोन कसोटी सामन्यात खेळणारा ब्रेंडन डॉगेट आणि गुलाबी चेंडूने खेळलेला मायकेल नेसर यांचाही संघात समावेश आहे.
चौथ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: ट्रॅव्हिस हेड, जेक वेदरल्ड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, मिशेल स्टार्क, स्कॉट बोलँड, ब्रेंडन डॉगेट, मायकेल नेसर, झाय रिचर्डसन.
Todd Murphy misses out ❌ Australia lock in all-pace attack for Boxing Day ⚡ 🔗 https://t.co/aEXjR21lLT pic.twitter.com/nkzajWGo69 — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 25, 2025
स्मिथ म्हणाला की निवडकर्त्यांना उद्या सकाळी “खूप गवताळ” एमसीजी खेळपट्टीवर पुन्हा एकदा नजर टाकून त्यांच्या वेगवान आक्रमणाला अंतिम स्वरूप द्यायचे आहे. इंग्लंडने आधीच त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. जोफ्रा आर्चर आणि ऑली पोप यांच्या जागी जेकब बेथेल आणि गस अॅटकिन्सन यांनी संघात स्थान मिळवले आहे.
इंग्लंड संघ: झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), विल जॅक्स, गस अॅटकिन्सन, ब्रायडन कार्स, जोश टंग.






