सौजन्य - bajrangpunia60 ही बंदी म्हणजे व्यक्तिगत द्वेष आणि राजकीय षडयंत्राचा भाग; 'नाडा'च्या कारवाईनंतर बजरंग पुनियाचा सरकारवर गंभीर आरोप
Bajrang Punia Tweeted After Ban of NADA : दरम्यान, बजरंग पुनियाने नॅशनल अॅंटी डोपिंग एजन्सीने बंदी घातल्यानंतर त्याच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर पोस्ट टाकत ही बंदी म्हणजे व्यक्तीगत द्वेष आणि राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचे म्हटले आहे. महिला पैलवानांच्या सुरक्षेसाठी आम्ही दिलेला लढा त्याच्याविरोधात आवाज उठवला होता त्याच्या विरोधात म्हणून आता माझ्यावर कारवाई होत आहे. तरीही आम्ही आमची महिलांसाठी, देशासाठी लढाई लढत राहणार आहोत. आम्ही अशा गोष्टींना घाबरणारे नाही.
बजरंग पुनियाची पहिली प्रतिक्रिया
यह चार साल का प्रतिबंध मेरे खिलाफ व्यक्तिगत द्वेष और राजनीतिक साजिश का परिणाम है। मेरे खिलाफ यह कार्रवाई उस आंदोलन का बदला लेने के लिए की गई है, जो हमने महिला पहलवानों के समर्थन में चलाया था। उस आंदोलन में हमने अन्याय और शोषण के खिलाफ अपनी आवाज़ बुलंद की थी।
मैं यह स्पष्ट करना…
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) November 27, 2024
कोर्टात ही लढाई सुरूच
बजरंग पुनियाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘नाडा’ने घातलेल्या बंदीवर कोर्टात अपिल करणार आहे. ही लढाई कोर्टात सुरूच आहे. त्यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत, हे सर्व भाजपचे षडयंत्र आहेच, सोबत ब्रिजभूषण शरण सिंह यांचासुद्धा यामध्ये हात आहे. असा घणाघाती आरोपदेखील केला. ही बंदी माझ्यासाठी कोणताही धक्कादायक प्रकार नाही, हे मागील एक वर्षापासून सुरू होते. मागे यांच्याच पॅनलने मला निर्दोष घोषित केले आणि तुम्ही खेळू शकता असे सांगितले.
माझ्याकडे निर्दोषतेचे सर्टीफिकेट
आता हेच पॅनेल मला बंदी घालत आहेत. असा कोणता रूल आहे ज्यामध्ये 4 वर्षांची बंदी लावता. डोपिंगला येऊ शकला नाही म्हणून 4 वर्षाची बंदी हे चुकीचे आहे, तसे पाहता 2 वर्षांची बंदी असते. मी तर केव्हाही डोपिंगला तयार होतो फक्त त्यांनी टेस्ट निर्दोष करावी. त्यामध्ये हेराफेरी नसावी, हे सर्व यांचे नाटक आहे, आम्ही महिलांकरिता यांच्याविरोधात दिलेला लढा आणि त्यामुळे भीती दाखवून आम्हाला मागे हटवायचा प्रयत्न करताहेत. मी नेहमीच ट्रायल दिलीये डोपिंग टेस्ट दिलीय माझ्याकडे त्याचे सर्टफिकेट आहे.
बजरंग पुनियाच्या करिअर दूरगामी परिणाम
देशाचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाला नॅशनल अॅंटी डोपिंग एजन्सीने 4 वर्षांसाठी निलंबित केले आहे. यामुळे बजरंग पुनियाच्या करिअर दूरगामी परिणाम होणार आहेत. आता भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याला नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (NADA) 4 वर्षांसाठी निलंबित केले केल्यानंतर त्याची कारकीर्द संपली का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मंगळवारी राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने बजरंगला निलंबित केले. पुनियाने 10 मार्च रोजी राष्ट्रीय संघ निवडीदरम्यान डोप चाचणीसाठी आपला नमुना देण्यास नकार दिला होता.
दरम्यान, बजरंग पुनियाने नॅशनल अॅंटी डोपिंग एजन्सीने बंदी घातल्यानंतर माध्यमांशी बोलताना, ‘नाडा’ने घातलेल्या बंदीवर कोर्टात अपिल करणार आहे. ही लढाई कोर्टात सुरूच आहे. त्यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत, हे सर्व भाजपचे षडयंत्र आहेच, सोबत ब्रिजभूषण शरण सिंह यांचासुद्धा यामध्ये हात आहे. असा घणाघाती आरोपदेखील केला.
नाडाची मोठी कारवाई
बजरंग पुनियाचे निलंबन २३ एप्रिल २०२४ पासून सुरू झाले होते. यानंतर युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनेही त्याला निलंबित केले. तथापि, बजरंगने निलंबनाविरुद्ध अपील केले होते, जे 31 मे रोजी अँटी-डिसिप्लिनरी डोपिंग पॅनेलने (ADDP) रद्द केले होते. यानंतर नाडाने बजरंगला २३ जून रोजी नोटीस दिली होती. या बंदीनंतर त्याच्या कारकिर्दीवर साहजिकच मोठा परिणाम होणार आहे. कोणत्याही खेळाडूला दुखापतीनंतर किंवा दीर्घ बंदीनंतर पुनरागमन करणे खूप अवघड असते. अशा बंदीनंतर खेळाडूची कारकीर्द जवळपास संपुष्टात येते, असे अनेकदा मानले जाते. आता या बंदीचा बजरंग पुनियाच्या कारकिर्दीवर काय परिणाम होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
बजरंग 4 वर्षे स्पर्धात्मक कुस्तीमध्ये परत येऊ शकणार नाही
अनुशासनात्मक डोपिंग पॅनेलने आपल्या आदेशात म्हटले आहे की, “पॅनेल मानते की ऍथलीट कलम 10.3.1 अंतर्गत मंजूरींना जबाबदार आहे आणि 4 वर्षांच्या कालावधीसाठी अपात्रतेस जबाबदार आहे.” निलंबनाचा अर्थ असा आहे की बजरंग 4 वर्षे स्पर्धात्मक कुस्तीमध्ये परत येऊ शकणार नाही आणि जर त्याला तसे करायचे असेल तर तो परदेशात कोचिंग नोकरीसाठी अर्ज करू शकणार नाही. बजरंगसाठी नाडाने घेतलेला हा मोठा निर्णय आहे. बजरंगने नकार दिल्याने त्याला चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.