फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बांग्लादेश विरुद्ध वेस्ट इंडिज : बांग्लादेश विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये नुकतीच T२० मालिका झाली. यामध्ये बांगलादेशच्या संघाने या मालिकेमध्ये एकतर्फी विजय मिळवला आहे. बांग्लादेश वेस्ट इंडिज यांच्यामध्ये झालेल्या तीन सामान्यांच्या मालिकेत बांग्लादेशी संघाने ३-० असा विजय मिळवून मालिका नावावर केली आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात बांग्लादेशच्या संघाने पहिली फलंदाजी करत १४७ धावा केल्या होत्या या धावा डिफेन्ड करण्यात बांग्लादेशचा संघ विजयी झाला आणि मालिकेमध्ये पहिला विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यांमध्ये बांग्लादेशच्या संघाने फार मोठी धावसंख्या उभारली नाही परंतु त्याच्या गोलंदाजांनी कमाल करत वेस्ट इंडिजच्या संपूर्ण संघाला १०२ धावांवर बाद करून मालिका नावावर केली होती.
IND vs WI : भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका केली नावावर, 60 धावांनी केलं पराभूत
बांग्लादेश विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये झालेल्या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात बांग्लादेशी फलंदाजांनी कमालीची कामगिरी करून दाखवली. बांग्लादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कॅप्टनने १४ धावा करून बाद झाला. त्यानंतर सलामीवीर फलंदाज परवेझ हुसेन इमॉनने खेळ सांभाळला आणि संघासाठी ३९ धावांची खेळी खेळली. संघासाठी सर्वात मोठी धावसंख्या जाकेर अलीने केली. जाकेर अलीने संघासाठी ७२ धावांची खेळी खेळून संघासाठी महत्वाचे योगदान केले. मेहंदी मिराजने संघासाठी २९ धावांची महत्वाची खेळी खेळली. पहिले फलंदाजी करत बांग्लादेशच्या संघाने ७ विकेट्स गमावून १८९ धावा केल्या होत्या.
First clean sweep in an away T20i series against the West Indies🏏🇧🇩🔥
PC: CWI#BCB | #Cricket | #BANvWI | #T20 pic.twitter.com/6Xrp4PgBpj
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 20, 2024
त्यानंतर प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजच्या संघाकडून कोणताही फलंदाज मोठीच धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. वेस्ट इंडिजच्या संघासाठी सर्वाधिक धावा रोमॅरियो शेफर्ड यांनी केल्या आहेत. रोमॅरियो शेफर्ड याने संघासाठी ३३ धावा केल्या.
गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर रिशाद हुसेन याने संघासाठी ३ विकेट्स घेतले तर तस्कीन अहमद आणि मेहंदी हसन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स नावावर केले. तंजीम हसन साकिब आणि हसन महमूद या दोघांनी प्रत्येकी १ विकेट घेतला. रोमॅरियो शेफर्डने गोलंदाजीमध्ये सुद्धा कमाल केली आणि संघासाठी २ विकेट्स मिळवले परंतु त्याच्या खेळाडूंनी त्याची साथ दिली नाही. अलझिरी जोसेफ, रोस्टन चेस आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
बांग्लादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन बऱ्याचदा अडचणींमध्ये पाहायला मिळाला आहे त्यामुळे त्याला संघामध्ये सुद्धा त्याला स्थान देण्यात आले नाही. बांग्लादेशमध्ये झालेल्या अनेक घटनांमुळे सुद्धा त्याला दोषी ठरवले जात होते.