फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड : भारताच्या संघाने कालच्या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाला पराभूत करून सेमीफायनलचे तिकीट जवळजवळ पक्के केले आहे. आज न्यूझीलंड विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाला पराभूत केले होते तर बांग्लादेशच्या संघाला पहिल्या सामन्यांमध्ये भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आजच्या सामन्यांमध्ये जर न्यूझीलंडच्या संघाने बांग्लादेशविरुद्ध विजय मिळवल्यास संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. जर न्यूझीलंडने आज बांगलादेशला हरवले तर संघाचे भारताच्या बरोबरीचे ४ गुण होतील. या स्थितीत, भारत आणि न्यूझीलंडचे संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
तर दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाचा दोन्ही सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. तर आता बांग्लादेशच्या संघकाकडे क्रिकेट चाहत्यांची नज़र असणार आहे. न्यूझीलंडच्या संघाने मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली दमदार सुरुवात केली आहे. आजच्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या संघाने यंग हा या वर्षी संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. न्यूझीलंडचा विल यंग हा या वर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ७ सामन्यात २४१ धावा केल्या आहेत. त्याने गेल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले. गोलंदाजीत वेगवान गोलंदाज मॅट हेन्री अव्वल स्थानावर आहे. त्याने या वर्षी ६ सामन्यात १६ विकेट्स घेतल्या आहेत.
तर मागील भारताविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये हृदयॉयने शतक ठोकले होते. सध्या तो बांगलादेशकडून हृदयॉयने सर्वाधिक धावा केल्या. तौहिद हृदयॉयने गेल्या सामन्यात भारताविरुद्ध शतक झळकावले होते. तो या वर्षी संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने एका सामन्यात १०० धावा केल्या आहेत. रिशाद हुसेन हा संघाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. रिशाहने १ सामन्यात २ विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे हे खेळाडू न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात अडचणी वाढवू शकतात.
Can New Zealand punch their ticket into the #ChampionsTrophy semi-finals or will Bangladesh keep their campaign alive? 🤔
How to watch 👉 https://t.co/S0poKnwS4p pic.twitter.com/nWAx8CKFF3
— ICC (@ICC) February 24, 2025
मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री आणि विल्यम ओ’रोर्क.
नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तन्जीद हसन, तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद आणि मुस्तफिजूर रहमान.