वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मीडिया)
ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने १६ धावा करून ही कामगिरी करून दाखवली आहे. याआधी, वैभव सूर्यवंशीने पहिल्या दोन सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यात मोठी कामगिरी केली. पहिल्या सामन्यात ३८ आणि दुसऱ्या सामन्यात त्याने ७० धावा केल्या.
हेही वाचा : IND VS PAK : ‘आम्ही त्याच पद्धतीने खेळू…’, अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानला सूर्याचा अनोख्या शैलीत इशारा..
ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विरुद्धचा तिसरा सामना शुक्रवारी खेळला गेला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे फक्त चार धावा करून माघारी परतला आणि सूर्यवंशी फक्त १६ धावा करून बाद झाला. तथापि, या काळात वैभव सूर्यवंशीने एक महत्त्वाचा विक्रम रचला आहे.
वैभव सूर्यवंशीची शानदार कामगिरी
वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये ११ डावात ५०.६४ च्या सरासरीने ५५६ धावा फटकवल्या आहेत. सूर्यवंशीने युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये ४३ षटकार मारण्याची किमया साधली आहे. युवा एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात या खेळाडूने मारलेले सर्वाधिक षटकार आहेत. त्याने उन्मुक्त चंदचा विक्रम मोडीत काढला आहे. ज्याने युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ३८ षटकार मारण्याची किमया साधली होती.
हेही वाचा : IND vs SL: कुलदीप यादवने वाढवली पाकिस्तानची चिंता! अंतिम सामन्यापूर्वी रचला मोठा इतिहास; वाचा सविस्तर
वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध युवा एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू बनला आहे. त्याने हसन रझा यांचा विक्रम मोडीत काढला आहे. केवळ १४ वर्षे आणि १८१ दिवसांच्या वयात, वैभव सूर्यवंशीने युवा एकदिवसीय सामन्यात चार अर्धशतके झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा विक्रम रचला आहे.






