फोटो सौजन्य - सोशल मिडिया
राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने २०२४ चा टी२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर त्यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. ६ सप्टेंबर २०२४ रोजी राजस्थान रॉयल्सने त्यांच्यावर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली. द्रविडने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए), भारतीय अंडर-१९ आणि भारतीय पुरुष वरिष्ठ संघात विविध पदांवर काम केले आहे. आयपीएल 2025 मध्ये संजू सॅमसन दुखापतीमुळे बरेच सामने खेळू शकला नाही त्यामुळे अनेक सामन्यासाठी रियान पराग याला कर्णधारपद देण्यात आले होते. त्याचबरोबर संघाने देखील फार काही चांगली कामगिरी केली नाही.
इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या आधी राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे. राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. फ्रँचायझीने ट्विटरवर याबद्दल माहिती दिली. राजस्थान रॉयल्सने ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये द्रविडचे आभार मानले. फ्रँचायझीने पोस्टसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, गुलाबी रंगात तुमची उपस्थिती तरुण आणि अनुभवी दोघांनाही प्रेरणादायी ठरली. नेहमीच शाही. नेहमीच आभारी. (Rahul Dravid resigns)
Your presence in Pink inspired both the young and the seasoned. 💗
Forever a Royal. Forever grateful. 🤝 pic.twitter.com/XT4kUkcqMa
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) August 30, 2025
राजस्थान राॅयल्सच्या सोशल मिडियावर त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे त्यामध्ये त्यांनी राहुलने का राजीनामा दिला याबाबतीत सविस्तर सांगितले. राजस्थान राॅयल्सने सोशल मिडियावर लिहीले आहे की, राजस्थान रॉयल्सने आज घोषणा केली की मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आयपीएल २०२६ च्या फ्रँचायझीसोबत त्यांचा कार्यकाळ संपवत आहे. राहुल गेल्या अनेक वर्षांपासून रॉयल्सच्या प्रवासात केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे खेळाडूंच्या पिढीवर परिणाम झाला आहे, पथकात त्यांनी मजबूत मूल्ये निर्माण केली आहेत आणि फ्रँचायझीच्या संस्कृतीवर एक अमिट छाप सोडली आहे.
पुढे सांगितले आहे की, फ्रँचायझी स्ट्रक्चरल रिव्ह्यूचा भाग म्हणून राहुलला फ्रँचायझीमध्ये एक व्यापक पद देण्यात आले होते, परंतु त्यांनी ते न घेण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्स, त्यांचे खेळाडू आणि जगभरातील लाखो चाहते राहुलला त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल हार्दिक आभार व्यक्त केले आहेत.
Official Statement pic.twitter.com/qyHYVLVewz
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) August 30, 2025