फोटो सौजन्य - X
ब्रिजभूषण शरण POCSO प्रकरण : भारतीय कुस्तीचा मुद्दा हा फारच चिघळला होता, यामुळे मोठ्या प्रमाणात भारताचे दिग्गज कुस्ती खेळाडु हे रस्त्यावर उतरले होते. यामध्ये विनेश फोगाट, बंजरंग पुनिया, साक्षी मलिक या खेळाडुंनी त्याच्या विरोधात आंदोलन पुकारत होते. भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध एका अल्पवयीन कुस्तीपटूने लैंगिक छळाचा खटला दाखल केला होता, या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता, जो पटियाला हाऊस कोर्टाने स्वीकारला आहे.
MI VS PBKS लढणार पहिल्या स्थानासाठी! श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय
भारतीय कुस्ती संघटनेचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या POCSO प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेला POCSO खटला पटियाला हाऊस कोर्टाने बंद केला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने POCSO प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेला रद्द करण्याचा अहवाल स्वीकारला.
ब्रिजभूषण शरण सिंह यांचे पुत्र प्रतीक भूषण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, आम्हाला एका खोट्या आणि बनावट प्रकरणात न्यायालयीन विजय मिळाला आहे. प्रत्येक निराधार आरोप आता न्यायाच्या कठड्यासमोर उघड होत आहे. हा सत्याचा विजय आहे आणि भविष्यातही हा विजय असाच चालू राहील.
हमने एक झूठे और मनगढ़ंत मामले में न्यायिक विजय प्राप्त की है। प्रत्येक तथ्यहीन आरोप अब न्याय के कठघरे में धराशायी हो रहा है। यह सत्य की जीत है — और यह जीत आगे भी कायम रहेगी। pic.twitter.com/PLWVMp1QGC
— Prateek Bhushan Singh (@PrateekBhushan) May 26, 2025
दिल्ली पोलिसांनी १५ जून २०२३ रोजीच या प्रकरणात रद्दीकरण अहवाल दाखल केला होता. सुनावणीदरम्यान तक्रारदाराने पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टला विरोध केला नाही. यापूर्वी १ ऑगस्ट २०२३ रोजी, कथित पीडिता आणि तिच्या वडिलांनी या प्रकरणातील पोलिस अहवालावर कोणताही आक्षेप घेतला नव्हता आणि पोलिस तपासावर समाधान व्यक्त केले होते. भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध एका अल्पवयीन कुस्तीपटूने लैंगिक छळाचा खटला दाखल केला होता, या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता, जो पटियाला हाऊस कोर्टाने स्वीकारला आहे.