Viral Video :ब्रॅड हॉगने मुलाखतीत मोहम्मद रिझवानची अशी टेर खेचली..; तुम्हालाही येईल जोरात हसायला!(फोटो-सोशल मीडिया)
मुंबई/दिलीप बनेः Mohammad Rizwan : पाकिस्तान म्हटलं की आपल्याला त्यांच्या खेळाडूंचे इंग्लिश मुलाखती आठवतात आणि आपण जोरजोरात हसायला लागतो. असाच एक फनी व्हिडिओ ब्रॅड हॉग आणि मोहम्मद रिझवानचा सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ब्रॅड हॉग रिझवानची मुलाखत घेताना दिसत आहे. रिझवान त्याच्या इंग्लिश भाषेत उत्तर देताना दिसतो. आपल्या सगळ्यांना रिझवानच इंग्लिश चांगलंच माहिती आहे. जेवढा तो स्लो खेळतो त्या पेक्षाही तो चुकीचं इंग्लिश फास्ट बोलतो.
ह्या व्हिडिओ मध्ये ब्रॅड त्याला विचारतो कि तुला विराट कोहली बद्दल काय वाटते. रिझवान त्याला असं उत्तर देतो मी आणि विराट आम्ही दोघेही पाणी पितो आणि जेवतो .. हे ऐकल्यावर जोर जोरात हसायला येते. नंतर हॉग त्याला विचारतो कि आजच्या सामन्याची रणनीती काय आहे ? मग रिझवान त्याला जे उत्तर देतो ते एवढे फनी आहे की, तो रिझवान म्हणतो कि आमची रणनीती फार सिम्पल आहे. एस ऑर नो तुम्हाला माहिती आहे कि, काही वेळेला तुम्ही शिकता किंवा जिंकता हे ऐकल्यावर हॉग सुद्धा हसला. पुढे रिझवान असं देखील म्हणतो कि आमची टीम शिकत आहे ते कुठेही कधीही . हे ऐकल्यावर तुम्हीहि जोरजोरात हसायला लागाल.
हेही वाचा : Virat Kohli : किंग कोहलीची बीसीसीआयविरोधात ‘विराट’ डरकाळी; खेळाडूंसाठीचे नियम चुकीचे, आवाज उठवणार..
शेवटी हॉग त्याला म्हणतो कि रिझवान तुझं इंग्लिश फारच सुधारलं आहे त्यावर रिझवान फनी उत्तर देतो, सगळ्या पाकिस्तानला वाटतं कि माझ इंग्लिश चांगलं आहे. शेवटी हॉग मोठयाने हसताना दिसतो. ही मुलाखत पाहताना तुम्हाला नक्कीच हसायला येईल. हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि मज्जा घ्या..
Brad Hogg interviewing Mohammad Rizwan after Match 😅 #funnyvideo pic.twitter.com/iA8c659z5d
— Richard Kettleborough (@RichKettle07) March 16, 2025
भारताने न्यूझीलंड संघाचा 4 विकेटने पराभव करून 12 वर्षांतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. या विजयाने भारताने तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. भारताने 9 महिन्यांत सलग दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला असून त्याने एकही सामना गमावला नाही. शेवटच्या सामन्यात भारताने सर्वोच्च कामगिरी करत विजयी ट्रॉफी उंचावली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्याने स्वत देखील अंतिम सामन्यात तुफानी खेळी करत सामाना भारताच्या पारड्यात झुकवला होता.