फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore 1st innings report : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामधील सामन्याचा पहिला डाव संपला आहे. दोन्ही संघांचा आयपीएल २०२५ मधील १८ व्या सीजनचा दुसरा सामना आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने फलंदाजी करत १९७ धावांचे लक्ष्य चेन्नई सुपर किंगसमोर उभे केले आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजांनी कमी धावसंख्येत महत्त्वाचे योगदान केले आहे. या सामन्यात नूर अहमदने त्याची फिरकीच जादू दाखवली आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सलामीवीर फलंदाज फिल्म सॉल्ट याने १६ मध्ये ३५ धावांची महत्त्वाची खेळी खेळली. यात त्याने एक षटकार आणि चौकार ठोकला. तर बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली याने मागील सामन्यांमध्ये अर्धशतकीय खेळी खेळली होती तर या सामन्यात त्याने ३० चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या. देवदत्त पड्डीकलने १४ चेंडूंमध्ये २७ धावा केल्या. जितेश शर्माने संघासाठी ६ चेंडूंमध्ये १२ धावा केल्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा कर्णधार रजत पाटीदारने संघासाठी महत्वाची खेळी खेळली. रजत पाटीदारने संघासाठी ३२ चेंडूंमध्ये ५११ धावा केल्या. यामध्ये त्याने ३ षटकार आणि ४ चौकार ठोकले. त्याच्या या महत्वाच्या खेळीने संघाला मोठी धावसंख्या उभी करण्यात यश मिळाले.
चेन्नई सुपर किंग्स गोलंदाजी बद्दल बोलायचे झाले तर नूर अहमदने आणखी एकदा त्याच्या फिरकीची जादू दाखवली आहे. त्याने ३६ धावा देऊन ३ विकेट्स नावावर केले आहेत. यामध्ये मथीशा पाथिराणाने चार ओव्हर मध्ये दोन विकेट्स घेतल्या आहेत तर रविचंद्रन अश्विन आणि खलील अहमदने प्रत्येकी एक एक विकेट घेतला आहे.