IND vs AUS 3rd Test 4th Day Weather : ब्रिस्बेनमध्ये चौथ्या दिवशी कसे असणार हवामान; पाऊस पुन्हा ठरला खलनायक
IND vs AUS 3rd Test 4th Day Weather : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची तिसरी कसोटी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात गाब्बा, ब्रिस्बेन येथे खेळली जाणार आहे. सामन्याचे तीन दिवस पूर्ण झाले असून, त्यात दोन दिवस (पहिला आणि तिसरा) पावसाने चाहत्यांची मजा लुटली. पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ 13.2 षटकेच खेळता आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण खेळ झाला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा पावसाने दणका दिला. अशा स्थितीत आता चौथ्या दिवशीही पावसामुळे खेळ खराब होणार का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. चला तर मग जाणून घेऊया चौथ्या दिवशी ब्रिस्बेनमध्ये हवामान कसा असेल.
चौथ्या दिवशीसुद्धा पावसाची शक्यता
The covers are on once again in Brisbane ☔ Australia are 28/0, with heavy rains at the Gabba ➡️ https://t.co/PupB4ooHCb #AUSvIND pic.twitter.com/kXsKH30uDW — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 14, 2024
तिसऱ्या दिवशी पावसामुळे केवळ 33.1 षटकांचा खेळ होऊ शकला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसामुळे जवळपास आठ वेळा खेळ थांबवण्यात आला. सततच्या पावसामुळे खेळाडूंना खेळावर जास्त लक्ष केंद्रित करता आले नाही.
खेळाच्या चौथ्या दिवशी हवामान कसे असणार
ब्रिस्बेनमध्ये गाबा कसोटीच्या चौथ्या दिवशी पावसाचा कहर होऊ शकतो. Accuweather च्या मते, कसोटीच्या चौथ्या दिवशी पावसाची जवळपास 100 टक्के शक्यता आहे. अशा स्थितीत चौथा दिवस पावसाने पूर्णपणे गमावला असे म्हणता येईल. या काळात कमाल तापमान 31 अंशांच्या आसपास आणि किमान तापमान 25 अंशांच्या आसपास राहू शकते. दिवसभरात ताशी १५ किमी वेगाने वारेही वाहू शकतात.
भारताची अवस्था वाईट
आतापर्यंत पूर्ण झालेल्या तीन दिवसांच्या खेळात टीम इंडियाची स्थिती खराब झाली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करीत 445/10 धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाने तिसऱ्या दिवसअखेर ४ विकेट्स गमावल्या. तिसऱ्या दिवसअखेर भारताची धावसंख्या ५१/४ अशी आहे. यावेळी केएल राहुल ३३ धावा करून खेळत असून रोहित शर्मा खाते न उघडता खेळत आहे.